Municipal Council Group Rules : चंद्रपूर - चंद्रपूर कांग्रेस पक्षातील गटनोंदणी व गटनेता पदावरून सुरु झालेल्या संघर्षाचा अखेर दिल्ली मध्ये होणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विभागीय आयुक्ताकडे रीतसर अर्ज करीत गटनोंदणी करीत गटनेता म्हणून नगरसेवक सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्यात आली होती. तत्पूर्वी २७ नगरसेवकांना बैठकीचे नोटीस देण्यात आले, १३ नगरसेवक/नगरसेविका बैठकीला उपस्थित होते, कागदपत्रांची अधिकृत प्रक्रिया पार पाडत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चा अधिकृत गट स्थापन करण्यात आला होता. मात्र पक्षात कुरघोडी करण्यासाठी ३० जानेवारीला कांग्रेस नगरसेवक राजेश अडूर यांनी आपल्या खाजगी लेटर पॅड वर बैठकीचे नोटीस नगरसेवकांना प्रत्यक्ष न भेटता त्यांच्या घरावर लावण्यात आले, गट नोंदणी व गटनेता निवडायचा असे त्या नोटीस मद्ये नमूद होते. विशेष बाब म्हणजे त्यांना कसलाही अधिकार नसताना त्यांनी हे बेकायदेशीर कृत्य करीत आज विभागीय आयुक्त कार्यालयात नवा गट स्थापन करण्यासाठी अर्ज दिला. त्यांचा अर्ज पूर्णतः बेकायदेशीर आहे याकरिता त्यांच्या गटाला मान्यता देऊ नये असे पत्र कांग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी विभागीय आयुक्तांना दिल्याने नवा गट नोंद झालेला नाही. (कांग्रेस नगरसेवकांच्या घरावर चिटकवल्या बैठकीच्या नोटीस, कांग्रेस पक्षात पुन्हा खळबळ)
कांग्रेस पक्षात मनपा निवडणुकीनंतर धानोरकर-वडेट्टीवार संघर्ष चव्हाट्यावर पोहोचला आहे, दररोज कांग्रेस पक्षात नव्या घडामोडी घडत असल्याने प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यामध्ये मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र आता याबाबतीत शेवटचा निर्णय दिल्लीत होणार असून ३ फेब्रुवारीला महत्वाची बैठक पार पडणार आहे. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार गटनोंदणी व गटनेता निवड करण्यात आली, त्याकरिता कांग्रेसच्या १३ नगरसेवकांनी विभागीय कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली.
मात्र ३० जानेवारीला नगरसेवक राजेश अडूर याना कसलाही अधिकार नसताना त्यांनी कांग्रेसच्या नगरसेवकांना बैठकीचे नोटीस पाठविले, ते पूर्णतः चुकीचे व बेकायदेशीर आहे, त्यानुसार महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम १९८६ व त्याअंतर्गत असलेला नियम १९८७ नुसार एखाद्या राजकीय पक्षाचे दोन वेगवेगळे गट नोंदणी करता येत नाही, गट नोंदणीकरिता बैठक बोलावण्याचे अधिकार फक्त शहर अध्यक्षाला आहे, एखादा नगरसेवक गटनोंदणी साठी स्वतःहून बैठक घेऊ शकत नाही. नोटीसही पाठवू शकत नाही.
राजकीय पक्षाची गटनोंदणी झाल्यावर त्या गटात इतर नगरसेवकांना समाविष्ट होता येते, जर ते समाविष्ट झाले नाही तर त्या सदस्यांना गटात सामील करण्यासाठी नोटीस काढण्याचा अधिकार फक्त विभागीय आयुक्तांना आहे. त्यानुसार अडूर यांनी नगरसेवकांच्या घरावर चिटकविलेले नोटीस पूर्णतः बेकायदेशीर आहे, राजेश अडूर हे एकाच पक्षाचे दोन गट बनवू शकतो अशी शक्यता नाकारता येत येत नसल्याने त्यांना दुसरा गट स्थापन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये असे पत्र कांग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.
२ फेब्रुवारीला राजेश अडूर यांनी नागपूर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन दुसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र कागदपत्रांची कमतरता असल्याने त्याना आयुक्तांनी ३ फेब्रुवारीला कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे कळविले आहे. तत्पूर्वी अडूर यांनी आपल्या निवासस्थानी नगरसेवकांची बैठक घेत सचिन कत्याल यांना गटनेता म्हणून निवडले. Municipal Council Group Rules
कांग्रेस शहर अध्यक्ष संतोष लहामगे यांच्या पत्राने दुसरा गट बेकायदेशीर रित्या स्थापन करण्याचा प्रयत्न सध्यातरी प्रशासनाने हाणून पाडला आहे.
Leave a Comment