Opium Farming Permission : मूल (चंद्रपूर) - राज्यात लागवड खर्चानुसार शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्ज काढत शेती करतो मात्र शेतमालाला उचित भाव मिळत नाही, कर्जबाजारी झाल्यावर मानसिक धक्क्यातून शेतकरी आत्महत्या करतात, यामुळे शेतकऱ्यांना अफू व गांजाची शेती करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी कवडूजी येनप्रड्डीवार यांनी केली आहे. (चंद्रपुरात पती-पत्नी घरातून करीत होते गांजा विक्री)
शेतकऱ्याला अफू व गांजाची शेती लागवड करण्याची परवानगी द्यावी हा लढा वर्ष २०१३ पासून शेतकरी येनप्रड्डीवार देत आहे, येनप्रड्डीवार यांनी याबाबत राज्य शासन, प्रधान सचिव, कृषी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्रालय, सचिव गृह विभाग, पंतप्रधान कार्यालय सह राज्य उत्पादन शूल विभागाला वर्ष २०१३ ते २०१५ व २०१६, २०२२ व २०२४ मध्ये पत्रव्यवहार करीत गांजा व अफूची शेती करण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे.
धानाला उचित भाव देण्याची मागणी केल्यास सरकार त्याकडे दुर्लक्ष करते. शेतकरी आज हवालदिल झाला आहे, त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर त्यांच्या शेतमालाला उचित भाव द्यायला हवा मात्र शासन त्यांच्या या व्यथेकडे लक्ष देत नाही. देशातील इतर राज्यात अफूची शेती करण्याची परवानगी आहे तर महाराष्ट्रात असा निर्णय का होत नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी करायचे असेल तर सरकारने अफू व गांजाची शेती करण्याची पर्वणी द्यायला हवी अशी मागणी कवडूजी येनप्रड्डीवार यांनी केली आहे.
Leave a Comment