२० मिनिटांपूर्वी काय घडलं? चंद्रपुरात कट्टर विरोधकांचं व्हॅलेंटाईन!

February 14, 2026 by Prakash Hande

Political valentine day : चंद्रपूर - १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस, प्रेमाच्या व्याख्या अनेक आहे, प्रियकर व प्रेयसी असे आपण गृहीत धरू नका, चंद्रपुरात १० फेब्रुवारीला राजकीय कट्टर विरोधकांनी एकत्र येत व्हॅलेंटाईन डे साजरा केला, सत्तेच्या आणाभाका घेत, हे विरोधक जवळ आले. भारतीय जनता पार्टी व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने एकमेकांसोबत प्रेमाला होकार देत मनपात सत्ता स्थापन करीत गुण्या गोविंदाने राहत आहे. (चंद्रपूर मनपात सत्ताधाऱ्यांचा महापौर पदग्रहण सोहळ्यावर बहिष्कार)

 

पण हे घडण्यापूर्वी नेमकं काय झालं? असा प्रश्न अनेकांना पडला होता, आज आम्ही News३४ च्या माध्यमातून महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या २० मिनिटांपूर्वी काय घडलं याबाबत सविस्तर माहिती देत आहोत. मनपा निवडणुकीत शिवसेना उबाठा हि भाजपच्या विरोधात लढली, भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र कुणाला याची कल्पना सुद्धा नव्हती कि हे कट्टर विरोधक चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी एकत्र येणार.

 

चंद्रपुरातील औष्णिक वीज प्रकल्पाकडे जाणाऱ्या मार्गावर सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, भाजप आमदार किशोर जोरगेवार, नगरसेवक प्रशांत दानव, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, नगरसेवक राहुल पावडे सह काही मोजकेच लोक या सत्ता वाटपाचे साक्षीदार आहे. राहुल पावडे यांनी सत्ता वाटपाच्या करारावर सह्या केल्या, त्यावेळी भाजप आमदाराने त्या कराराचा कागद घेण्याचा प्रयत्न केला मात्र पावडे यांनी तो कागद त्यांना दिलाच नाही, आणि सुसाट वाचनाकडे निघाले.

 

विशेष म्हणजे उपमहापौर पदाबाबत स्पष्ट काही ठरले नव्हते, हे त्याक्षणी ठरले, यावेळी दानव मला काय मिळणार असे उच्चारत राहिले, शिवसेनेचे कदम यांनी अरे यांचं काही बघून घ्या,म्हणत राहिले, मग आमदार जोरगेवार यांनी सत्ता वाटपात कोणती पदे कुणाला द्यायची हे ठरविले. सत्तेचा मार्ग मोकळा झाला आणि दोन्ही पक्षाचे नेते महानगरपालिकेकडे निघाले.

 

शिवसेना उबाठा जवळ नगरसेवक राहुल वीरूटकर असताना सुद्धा उपमहापौर पदासाठी बाहेरच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात आले, म्हणजे वीरूटकर यांच्या पक्षप्रेमाला नाकारण्यात आले. प्रशांत दानव यांचा शिवसेनेत प्रवेश करीत थेट उपमहापौर पदावर विराजमान करण्यात आले, कांग्रेसने प्रेमाला नकार दिला आणि आपण आता एकटं जगायचं व यांच्याशिवाय मोठं व्हायचं असं मनात विचार करीत दानव मनपा निवडणुकीला सामोरे गेले. निवडणुकीत दणदणीत विजय झाला व त्यांना आपल्या नव्या प्रेमाच्या रूपात शिवसेना ठाकरे पक्ष मिळाला. Political valentine day

 

अपक्षाला पक्ष मिळाला आणि उपमहापौर पदावर गवसणी म्हणजेच दानव यांचं प्रेम सार्थक झालं, प्रेमाच्या व्याख्या अनेक आहेत, फक्त प्रियकर व प्रेयसी नाहीतर कट्टर राजकीय विरोधक या सत्तेच्या प्रेमापोटी एकत्र येऊ शकतात हे चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीत दिसले, हि सर्व परिस्थिती बघता हे प्रेम पुढील ५ वर्षे टिकणार कि यांचा ब्रेकअप होणार यावर सध्यातरी निश्चितता नाहीच.  

Leave a Comment

+