Road Accident Death : मूल : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या युवकाला ट्रकने चिरडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मूल सिंदेवाही मार्गावरील मरेगाव बसस्थानकाजवळ रविवारी (दि.२२) सकाळी ७ वाजेदरम्यान घडली. अजय नागोराव नान्हे (३५ ), रा. पेंढरी, तालुका सिंदेवाही, असे मृतकाचे नाव आहे. (औषध आणायला गेला आणि झाला अपघात)
सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील अजय नान्हे हा युवक मूल मध्ये नोकरीवर असलेल्या आपल्या भावाकडे दोन दिवसांपूर्वी आला होता. रविवारी सकाळीच आपल्या गावाकडे जाण्यासाठी पहाटेच पायदळ निघाला. मरेगाव बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला झोपला असता सिंदेवाही येथून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक जे. एच ०९ बी.सी ८३६० ने युवकाला चिरडले. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.
घटनेनंतर ट्रॅक चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, चालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुबोध वंजारी करत आहेत.
Leave a Comment