मुंबईला चकरा मारण्याची गरज नाही! महिला आयोगच पोहचला चंद्रपूरकरांच्या दारी; पाहा काय घडलं?

February 18, 2026 by Prakash Hande

Rupali Chakankar Chandrapur : चंद्रपूर :  ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जनसुनावणीमध्ये महिलांच्या 95 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आलीकार्यवाही करीता 5 पॅनलचे गठन करण्यात आले होतेआजच्या जनसुनावणीमध्ये वैवाहिक / कौटुंबिक समस्यांच्या 79 तक्रारीसामाजिक समस्यांच्या 5, मालमत्ता / आर्थिक फसवणुकीच्या 6, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळबाबत 1 तक्रार व इतर 4, अशा एकूण 95 तक्रारींवर कार्यवाही झाली. (राजुरा शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शिक्षकांसह तिघांना अटक)

 

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या जनसुनावणीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह सदस्य सचिव नंदिनी आवडेअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेअपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारप्रकल्प संचालक मंजिरी टकलेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मेभागवत तांबेमनपा उपायुक्त संदीप चिद्रावार आदी उपस्थित होते.

 

उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करतांना श्रीमती चाकणकर म्हणाल्यामहिलांच्या तक्रारी जागच्या जागेवर सुटाव्यात्यांना न्याय मिळावाया उद्देशाने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहेअनेक महिलात्यांच्या समस्यांबाबत तक्रारी करतातमात्र यंत्रणेकडून त्याची दखल घेतली जात नाहीहे अतिशय दुर्दैवी आहेमहिलांच्या तक्रारींबाबत कोणतीही टाळाटाळ न करता संबंधित यंत्रणेने तात्काळ दखल घ्यावी व त्याची गांभिर्याने सोडवणूक करावी.

 

महिलांना आपल्या समस्यांबाबत मुंबईत चकरा माराव्या लागू नयेस्थानिक स्तरावरच त्यांच्या तक्रारींची सोडवणूक व्हावीया उद्देशाने महिला आयोगच तुमच्या दारी आला आहेभरोसा सेलदामिनी पथकाच्या माध्यमातून पोलिस विभाग चांगले काम करीत आहेकौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वाधिक तक्रारी आयोगाकडे येतातमात्र हा वाद होऊच नयेयासाठी विवाहापुर्वीच तरुण मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहेहुंडाबळी कायदा अस्तित्वात असूनही हुंड्यासाठी मुलींचा छळ केला जातोहुंडा देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेतआपल्या कर्तुत्वावर मुलींचे लग्न करात्यासाठी मुलींना चांगले शिकवाबालविवाहाबाबतही पालकांनी सजग राहावेअसे आवाहन श्रीमती चाकणकर यांनी केले. Rupali Chakankar Chandrapur

 

आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे म्हणाल्याआजच्या जनसुनावणीला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहतामहिला आपल्या अधिकारांबाबत जागृत आहेअसे निदर्शनास येतेमहिलांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्यात येत आहे.

अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉव्यवहारे म्हणालेशासनाच्या विविध विभागांमार्फत महिलांसाठी योजना राबविल्या जातातत्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून होत आहेप्रशासनामध्ये महिलांची भागिदारी जास्तीत जास्त असावीयासाठीएक टीमवर्क म्हणून जिल्ह्यात काम करीत असल्याचे त्यांनी सांगितलेअपर पोलिस अधिक्षक श्रीकातकडे म्हणालेभरोसा सेल द्वारे महिलांच्या समस्या सोडविल्या जाताततसेच महिलांवर अन्याय – अत्याचार होऊ नये म्हणून दामिनी पथकाद्वारे नियमित पेट्रोलिंग सुरू असतेपोलिस काकापोलिस दिदी उपक्रमांतर्गत शाळा – महाविद्यालयांना भेटी देऊन जनजागृती केली जातेअसे ते म्हणाले.

 

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केलेसंचालन राणी खडसे यांनी तर आभार मोरेश्वर झोडे यांनी मानले.

Leave a Comment

+