दुर्गापूर पोलीस ठाण्यात आयपीएसची एन्ट्री!, पोलीस निरीक्षकाची दुसऱ्यांदा कंट्रोल रूमला रवानगी

March 09, 2026 by Prakash Hande

Sandip Ekade Chandrapur Police : चंद्रपूर - कोरपना, कंट्रोल रूम ते दुर्गापूर आता पुन्हा कंट्रोल रूम चा प्रवास करण्याची वेळ पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्यावर आली आहे, अनेक वादाने ग्रस्त असल्यावर सुद्धा पुन्हा वाद करून नेहमी प्रकाश झोतात राहणारे पोलीस निरीक्षक एकाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दोनदा एकाच ठिकाणी वर्णी लागण्याचा नवा कीर्तिमान स्थापित केला आहे. (बल्लारपुरात युवकाकडे आढळली पिस्टल व जिवंत काडतुसे)

 

कोरपना पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक असताना एकाडे यांनी एका युवकाला बेदम मारहाण केली होती, त्याबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याकडे तक्रार केल्यावर तात्काळ एकाडे यांची कंट्रोल रूम मध्ये उचलबांगडी करण्यात आली होती.

 

काही काळ लोटल्यावर एकाडे दुर्गापूर पोलीस ठाण्यात रुजू झाले, मात्र तिथेही नवनवीन वादात त्यांचे नाव आले, पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी याबाबत पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन यांच्याकडे लेखी तक्रार दिली, त्या प्रकरणाची चौकशी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यादव यांनी चौकशी केल्यावर त्याचा अहवाल सादर केला मात्र कारवाई झाली नाही.

 

तक्रारकर्त्यानी स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याने थेट विशेष पोलीस महानिरीक्षक पाटील यांच्याकडे दाद मागितली, आपल्या पोलीस निरीक्षकावर होत असलेल्या तक्रारीची शहानिशा आयजी यांनी केली. आयजी पाटील यांनी एकाडे यांना नागपूरमध्ये बोलावीत पोलीस निरीक्षकाची झडती घेतली. यानंतर दुर्गापूर पोलीस स्टेशनमधून त्यांची उचलबांगडी करीत परिविक्षाधीन आयपीएस गौरव कायंदे पाटील यांची वर्णी लावली. आता दुर्गापूर पोलीस ठाण्याचा कारभार आयपीएस अधिकारी सांभाळणार असून एकाडे यांना कंट्रोल रूम मध्ये रुजू करण्यात आले. 

Leave a Comment

+