Satish Warjurkar Resignation : चंद्रपूर - चिमूर विधानसभा निवडणूक लढविणार माजी जिल्हापरिषद अध्यक्ष, महाराष्ट्र कांग्रेसचे प्रदेश महासचिव सतीश वारजूरकर यांनी कांग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, यासह माजी आमदार डॉ. अविनाश वारजूरकर व साईश सतीश वारजूरकर यांनी सुद्धा कांग्रेस पक्षाचा राजीनामा प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठविला आहे. (भारतीय जनता पार्टीची जम्बो कार्यकारणी जाहीर)
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कांग्रेस पक्ष हळूहळू वापसी करीत असताना वारजूरकर यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सतीश वारजूरकर यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केले आहे कि कांग्रेस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढली आहे, या गटबाजीचा फटका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बसत आहे.
पक्षाचा धंद्यासाठी होणारा वापर याकडे पक्षश्रेष्ठींचे याकडे दुर्लक्ष या सर्व बाबींना कंटाळत सतीश वारजूरकर, डॉ. अविनाश वारजूरकर व साईश वारजूरकर यांनी राजीनामा दिला. चिमूर विधानसभा हि विजय वडेट्टीवार यांचं पूर्वीचे क्षेत्र होते, या क्षेत्रात वडेट्टीवार यांचा दबदबा आजही कायम आहे मात्र कार्यकर्ते व पदाधिकारी वडेट्टीवार यांच्या कार्यप्रणालीवर खुश नसल्याचे दिसत असल्याचे चित्र आहे. यामुळे पक्षाचे जुने कार्यकर्ते व पदाधिकारी हे कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे.
राजीनामा दिल्यावर वारजूरकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लवकरच वारजूरकर यांचा भाजप पक्षात प्रवेश होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आधीच धानोरकर-वडेट्टीवार संघर्षात चंद्रपूर मनपा हातातून गेली.
आता हळूहळू चंद्रपूर जिल्ह्यातील जुने पदाधिकारी कांग्रेस पक्षाची साथ सोडून जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात चंद्रपूर जिल्ह्या भाजपयुक्त तर कांग्रेसमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.
Leave a Comment