Self-Proclaimed PM : वरोरा (चंद्रपूर) - पंतप्रधान यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन दिले कि मला अंगरक्षक व पिस्टल तात्काळ घरी पोहोचविण्यात यावे मात्र या मागणीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे पोलीस निरीक्षकांना पदमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. (चंद्रपूर शहरात काळ्या धुळीचे साम्राज्य)
हा अर्ज १९ फेब्रुवारीला नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते, पण हा अर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीतर चंद्रपूर जिल्ह्यातील स्वयंघोषित पंतप्रधान महादेव गुलाब आसेकर यांनी दिला आहे, विशेष म्हणजे आसेकर यांनी आपल्या चारचाकी वाहनावर पंतप्रधान भारत सरकार असे स्टिकर लावले आहे.
त्यांनी आपल्या अर्जात पंतप्रधान यांना मिळणारे प्रमाणपत्र, अंगरक्षक व पिस्टल घरपोच देण्यात यावे. माझ्या या मागणीकडे वरोरा पोलीस दुर्लक्ष करीत आहे. ते कर्तव्यात हयगय करीत असून त्यांना तात्काळ पदावरून निलंबित करीत त्यांच्या जागी वर्षा तंदुलकर यांची पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात यावी. आसेकर हे चंद्रपूर जिल्ह्यातील अभ्यंकर वार्ड वरोरा शहरात राहतात.
महादेव आसेकर यांना शेतजमिन विक्रीतून कोट्यवधी रुपये मिळाले, या पैश्यातून आसेकर यांनी खासदार आमदार यांच्यासारखा रुबाब दाखविण्यासाठी फॉर्च्युनर गाडी घेतली व माझी पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली आहे अशी बतावणी सध्या सर्वत्र आसेकर करीत आहे.
Leave a Comment