Smart Thief Arrested । जेवणाचं आमिष दाखवून दुचाकी चोरणारी नवी स्टाईल; मूल पोलिसांनी 'असा' लावला छडा

April 10, 2026 by Prakash Hande

Smart Thief Arrested Chandrapur : मूल (चंद्रपूर) - रुग्णालयातून बाहेर निघत असताना एका अनोळखी मुलाने दुचाकी धारकाला मला पुढे सोडून दे, एक काम कर माझ्यासोबत जेवायला चल असे म्हटले, जेवण झाले आणि त्या दुचाकी धारकाचे वाहन त्या अनोळखी मुलाने लंपास केले. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याने ३ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. (चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा ३ मुली बेपत्ता)

 

७ एप्रिल रोजी २२ वर्षीय रुपेश पेंदोर हा सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान काकाच्या मुलीला रुग्णालयात उपचार करण्यासाठी गेला होता, काकाच्या मुलीला रुग्णालयात दाखल केल्यावर रुपेश घरी जाण्यासाठी निघत असताना रुग्णालयात एक अनोळखी मुलगा भेटला, तो म्हणाला कि मला कोरक्कू मोहल्ला मूल मध्ये जायचे आहे, मला सोडून दे, काही अंतरावर गेल्यावर त्या मुलाने रुपेशला हॉटेलमध्ये जेवण करायला चल असे म्हटले. त्या मुलाने विनवणी केल्यावर रुपेश व तो मुलगा श्री साई धाबा मूल मध्ये जेवण करायला थांबले.

 

रुपेश ने दुचाकी वाहन क्रमांक MH३४ CT १२०६ हि बाहेर पार्क केली, दोघे जेवण करीत असताना अचानकपणे त्या मुलाने दुचाकी ची चाबी घेऊन बाहेर गेला, जेवण झाल्यावर रुपेश बाहेर आला असता त्याला दुचाकी आढळली नाही. दुचाकी व त्या अनोळखी मुलाचा शोध घेतला असतो ते आढळून आले नाही. याबाबत रुपेश ने मूल पोलीस स्टेशनमध्ये घडलेला घटनाक्रम सांगत तक्रार दिली.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता अनोळखी आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक पद्धतीने तपास केला असता आरोपी हा बेंबाळ मध्ये दुचाकीसह पोलिसांना गवसला. २४ वर्षीय आशिष उर्फ रितिक जानकीराम चौधरी राहणार सोनापूर देशपांडे तालुका गोंडपिपरी याला अटक केली.

 

आरोपीची चौकशी केली असता त्याने एकूण ३ दुचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली, तिन्ही गुन्हे मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते. आरोपीकडून ३ दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात सपोनि सुबोध वंजारी, पोलीस कर्मचारी भोजराज मुंडरे, चिमाजी देवकते, दिलीप आदे, शंकर बोरसरे व संदीप चुदरी यांनी केली.  

 

Leave a Comment

+