Tadoba Tiger Video : चंद्रपूर - ताडोब्यातील मोहर्ली पदमापूर मार्गावर वाघ रस्ता ओलांडत असताना नागरिकांनी थांबत वाघाचा व्हिडीओ शूट केला इतकंच नव्हे तर हे करीत असताना नागरिक वाघाच्या अगदी जवळ गेले होते, याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर वनविभागाने कारवाई करण्याचा पवित्रा घेत चौकशी सुरु केली आहे. (बैलाला वाचवायला गेली आणि स्वतःच झाला शिकार)
१५ मार्च रोजी मोहर्ली-पदमापूर मार्गावर वाघ हा शांततेने रस्ता ओलांडत होता, यावेळी अनेक नागरिकांनी वाहने थांबवीत रस्त्यावर गर्दी करीत वाघाचा रस्ता अडविण्याचे काम केले, इतकेच नव्हे तर वाघाचा पाठलाग करीत व्हिडीओ बनविण्यात आला, या गंभीर प्रकरणाची दखल वनविभागाने घेतली असून ज्यांनी वाहने जे नागरिक रस्त्यावर उतरत व्हिडीओ बनवीत होते त्यांच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनेही जप्त करण्याची कारवाई वनविभागाने सुरु केली आहे.
व्हिडिओमधील नागरिकांची ओळख पटविणे सुरु असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मोहर्ली मधील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहे, व्हिडीओ मध्ये असलेल्या आरोपींची ओळख पटल्यास 9834689541 या क्रमांकावर माहिती द्यावी. असे आव्हान करण्यात आले आहे.
Leave a Comment