Teacher Saves School Girl : गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची एक धक्कादायक घटना बुधवारी (८ मार्च) समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीचे वडीलच आरोपी असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. (अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही, कोरपना पोलिसांचा तपास सुरु)
मुलगी इयत्ता नववीत शिकत असून कुटुंबात वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे नेहमी वाद होत असत. त्यामुळे सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुलीची आई दोन्ही मुलांना घेऊन राजुरा येथे माहेरी गेली होती. मात्र, परीक्षेच्या निमित्ताने वडिलांनी मुलीला पुन्हा गावात आणले. याच काळात आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दुसऱ्या दिवशी मुलगी परीक्षा देण्यासाठी शाळेत आली असता तिच्या बॅगेत कपडे आढळल्याने शिक्षकांना संशय आला. त्यांनी विचारपूस केल्यावर मुलगी भावनिक झाली आणि तिने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर शिक्षकांनी तत्काळ पोलिस पाटील यांना माहिती देऊन लाठी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत येऊन मुलीचा जबाब नोंदवला आणि तातडीने गुन्हा दाखल केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी चंद्रपूर येथे करण्यात आली. अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या घरातून अटक केली असून सध्या तो पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात शाळेतील शिक्षकांची सतर्कता निर्णायक ठरली.
Leave a Comment