vba corporators suspicious role : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे २ नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने भाजपचा महापौर व उबाठा चे उपमहापौर एक मताने व ईश्वरचिठ्ठीने जिंकून आले. वंचितच्या २ नगरसेवकांची भूमिका हि आजही संशयाच्या भोवऱ्यात आहे, पक्ष श्रेष्ठीने कांग्रेस पक्षाला मतदान करण्याचे सांगितले असताना सुद्धा वेळेवर दोन्ही नगरसेवकांनी आपले फोन बंद करीत मतदान प्रक्रियेत गैरहजर राहिले. पक्ष श्रेष्ठीने तात्काळ चंद्रपूर शहर कार्यकारणी बरखास्त केली, यावर वंचितचे माजी अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. (चंद्रपुरात सत्तेसाठी राजकीय पक्षाचं व्हॅलेंटाईन)
चंद्रपूर मनपा निवडणुकीत ६६ जागेपैकी कांग्रेस २७, भाजप २३, शिवसेना उबाठा ६, जनविकास सेना ३, वंचित २, अपक्ष २, शिंदेसेना १ व AIMIM चा १ नगरसेवक निवडून आला, ३४ हा बहुमताचा आकडा होता मात्र बहुमतापासून सर्वच पक्ष दूर होते, शिवसेना उबाठा व वंचितने ८ नगरसेवकांचा गट स्थापन केला, त्या गटासोबत स्नेहल रामटेके आणि पक्षाचे २ नगरसेवक सोबत होते. शेवट्पर्यंत कांग्रेस पक्षाला मतदान करण्याचे ठरले असताना सुद्धा ऐनवेळी उबाठा ने आपला निर्णय बदलवीत भाजपला समर्थन दिले. त्यामुळे वंचित आघाडीचे २ नगरसेवक हे कांग्रेस पक्षाला महापौर पदाच्या निवडणुकीत मतदान करतील अशी अपेक्षा होती मात्र ऐनवेळी दोन नगरसेवक मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहिले. आजही त्या नगरसेवकांनी आपली बाजू मांडली नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो असता ते आम्हाला भेटले नाही, एकदा फोनद्वारे बोलणं झालं असताना शिवसेना उबाठा व्हीप काढणार इतकंच सांगत त्यांनी फोन बंद केला, त्यानंतर आमचं बाणही झालं नाही अशी प्रतिक्रिया स्नेहल रामटेके यांनी दिली.
रामटेके म्हणाले कि मनपा निवडणुकीनंतर आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेत चंद्रपुरातील राजकीय परिस्थिती बाबत अवगत केले होते, त्यावेळी कांग्रेस पक्षाला मतदान करायचे असे ठरले होते. पण ऐनवेळी नगरसेवक नॉट रिचेबल झाले, विशेष म्हणजे महापौर व उपमहापौर मतदानाच्या काही वेळेपूर्वी पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी यांनी नगरसेवकांसोबत चर्चा करीत मतदान कांग्रेसला करायचं असे सांगितले होते. पण तसे काही झाले नाही, पक्षाने याचं खापर माझ्यावर फोडत मला व कार्यकरणीला पदमुक्त केले.
निवडणूक झाल्यापासून स्नेहल रामटेके हे नगरसेवकांसोबत होते, मग ऐनवेळी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्यापासून दूर का झाले, नगरसेवक आपली भूमिका बदलवित होते तर त्यांना समजाविण्यात का आले नाही? त्यांची अडचण काय होती हे जाणून का घेतले नाही असे अनेक प्रश्न वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात उपस्थित झाले आहे. अद्यापही नगरसेवक पुढे आले नाही. विशेष बाब म्हणजे दोन पैकी एक नगरसेवक त्यांच्या प्रभागात राहतात तर ते अद्यापही त्यांना भेटले नाही हि बाब संशयास्पद आहे. vba corporators suspicious role
राजकीय जाणकारांच्या मते वंचित आघाडीचे नगरसेवकांनी हे सर्व पूर्वनियोजितपणे केले असल्याचा दावा केला आहे, ऐनवेळी त्यांनी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूक मतदान प्रक्रियेत सहभागी न होणे म्हणजे त्यांनी जाणूनबुझून भाजप पक्षाची मदत करण्याचे काम केले आहे.
Leave a Comment