Vijay Wadettiwar Chandrapur Event : चंद्रपूर - जागतिक महिला दिनाच्या शुभपर्वावर बाबूपेठ महिला बचत गट व सावित्रीबाई बहुउद्देशीय संस्था रणरागिणी महिला पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिलांच्या नृत्य स्पर्धा तसेच आनंद मेळावा अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल बाबूपेठ येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. (लोहार डोंगरी खाण प्रकल्पविरोधात संसदेत आवाज उचलणार - खासदार धानोरकर)
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार गटनेता,महाराष्ट्र विधानसभा (काँग्रेस पक्ष) तथा माजी विरोधी पक्षनेता यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मा.दिप्तीताई सोनटक्के नगराध्यक्ष न प घुघूस,रामूभैया तिवारी माजी अध्यक्ष शहर काँग्रेस,मा,राजूभाऊ रेड्डी उपाध्यक्ष न प घुघूस ,मा.राजेश अडूर गटनेता मनपा,डॉ दिलीप कांबळे,प्राचार्य नरेंद्र बोबडे,कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक सौ चंदाताई वैरागडे संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट यांचे सह सत्कार मुर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
महिला दिनाच्या औचित्याने चंद्रपूर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कर्तृत्ववान महिलां वैद्यकीय क्षेत्र मा.डॉ प्रेरणा कोलते ,ओद्योगिक क्षेत्र मा.वनिता धोटे,सामाजिक क्षेत्र मा.शाईन शेख शैक्षणिक क्षेत्र मा.उमा कुकुडपवार ,राजकीय क्षेत्र मा.दीप्ती सोनटक्के या पाच कर्तृत्ववान महिला भगिनीचा तसेच नवनिर्वाचित नगरसेवक मा राजेश अडूर,सचिन कत्याल,विनोद लभाने अभिषेक डोइफोडे,संजविनी वासेकर सोफिया तवंगर,महानंदा वाळके, आकाश मानकर,करिश्मा जंगम,अनिता चोखे, सोनिया उंदिरवाडे यांचाही सन्मान मा.विजयभाऊ वडेटीवार,मुख्य आयोजक सौ चंदाताई वैरागडे तसेच उपस्थित मान्यवर मंडळी यांचे शुभ हस्ते शाल,सन्मान चिन्ह व पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेतून आयोजक सौ चंदाताई वैरागडे यांनी बचत गट स्थापन करण्याचा उद्देश सांगताना बचतगट केवळ पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी स्थापन केला नसून महिलाच सक्षमीकरण ,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण ,गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा,आरोग्य तपासणी,आनंद मेळावे,सांस्कृतिक स्पर्धा,नृत्य स्पर्धा कोरोना काळातील एक घास मदतीचा उपक्रम असे एक ना अनेक उपक्रम राबविणारे आमचा महिला बचत गट आणि महिला पतसंस्था आहे.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचे तडफदार नेतृत्व कार्यक्रमाचे उद्घाटक विजुभाऊ वडेट्टीवार यांनी बचत गटाच आणि महिला पतसंस्थेचं इतक अफाट जनसागर मी पहिल्यांदाच बघितला,मी फक्त ऐकलं होत चंदाताई महिलांचे प्रत्येक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध पद्धतीने घेतात परंतु आज मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघून डोळ्याचे पारणे फिटेल असा भरगच्च कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण करण्याचं महान कार्य चंदाताई च्या नेतृत्वात होत आहे याबद्दल अभिमान असल्याचे सांगून याच सामाजिक कार्यातून आम्ही काँग्रेस पक्षांनी चंदाताई वर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि त्यांनी त्या पदाला योग्य न्याय देण्याच काम केले आणि मनुनच महानगर पालिकेच्या निवडणुकीत या बाबूपेठ प्रभागातून रणरागिणीनी चंदाताई यांनी ऐतीहासीक विजय मिळविला,आता या बाबुपेठ च्या विकासासाठी मी सदैव चंदाताई आणि आमचे सर्व नगरसेवक यांच्या खंबीरपणे पाठीशी राहून या बाबूपेठ चा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील. Women's Day Celebration
आनंद मेळाव्यात बचत गटातील महिलांनी १०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे चवदार खाद्य पदार्थ चे स्टॉल लावले ,याचा मनसोक्त लाभ उपस्थितानी घेतला.विविध नृत्य स्पर्धेत सामूहिक नृत्य,सोलो डांस,सासू सून डांस,कपल डांस इत्यादी स्पर्धेत तब्बल ४५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेऊन एकापेक्षा सरस नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली,,विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकातून प्रथम,द्वितीय तृतीय क्रमांक तसेच तीन प्रोत्साहनपर बक्षीस पटकवलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले,स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण मा.पूजाताई मडावी, मा. रिंकूताई देठे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सौ.मेघा बजाईत, कु तनुश्री दूधबळे, प्रियंका खनके, तसेच आभार विजयराव खनके यांनी मानले
Leave a Comment