Son Attacks Parents : वरोरा (चंद्रपूर) - जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगावात कारल्याची भाजी का केली म्हणून दारुड्या मुलाने आपल्या आईला बेदम मारहाण करीत तिचा खून केल्याची घटना ताजी असताना अशीच एक घटना वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. या घटनेत जेवणाला उशीर का झाला म्हणून दारुड्या मुलाने आई-वडिलांना बेदम मारहाण केली. याबाबत वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (कारल्याची भाजी का केली म्हणून दारुड्या मुलाने आईची केली हत्या)
वरोरा तालुक्यातील नागरी गावातील हि घटना असून ७० वर्षीय जिजा मारोती परचाके यांनी मुलगा हनुमान परचाके विरुद्ध तक्रार दिली. हनुमान परचाके ला दारूचे व्यसन असून तो नेहमी आई वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडत असतो.
२० फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास हनुमान परचाके हा दारू पिऊन घरी आला, त्याने आईला जेवण वाढायला सांगितले, जेवण केल्यावर हनुमान ने जेवणाला इतका उशीर का केला म्हणून शिवीगाळी करीत काठीने आई जिजाबाई ला मारहाण केली उद्यापासून जेवण वेळेवर मिळाले नाही तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी हनुमान ने दिली.
जिजाबाई यांचे पती मारोती परचाके यांनी आई-मुलाच्या भांडणात मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता मुलाने वडिलाला काठी व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. घडलेल्या या प्रकारची जिजा परचाके यांनी पोलीस स्टेशन वरोरा मध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी हनुमान परचाके विरुद्ध कलम ३५२, ३५१ (२) व ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
Leave a Comment