Fake Liquor । वरोऱ्यात बनावट दारूचा महापूर! ५० बॉक्स जप्त

March 15, 2026 by Prakash Hande

Fake Liquor Seizure : चंद्रपूर - महाराष्ट्र शासनाने महसूल वाढावा याकरिता मद्यावर अधिक कर लावला आहे, करातून सुटका व्हावी याकरिता आता काही दारू व्यावसायिक बनावट दारू ग्राहकांच्या पिण्यास देत आहे, राज्य उत्पादन शुल्क विभागाने वरोऱ्यात २ लाखांची बनावट दारू जप्त केली आहे. (एकाच महिन्यात ३ मुली बेपत्ता)

 

वरोऱ्यात मद्याचा साठा चारचाकी वाहनाने येणार अशी गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला १३ मार्च रोजी प्राप्त झाली, माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क पथकाने रात्री बोर्डा चौक ते राधा मिलन मंगल कार्यालय रोडवर नाकाबंदी केली असता त्यावेळी चारचाकी स्कॉर्पिओ वाहन क्रमांक MH ३४ CD ३३३६ ला थांबवित झडती घेतली असता वाहनात रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे ९० मिली क्षमतेचे ५० बॉक्स असा बनावट देशी मद्यसाठा मिळून आला.

 

उत्पादन शुल्क विभागाने वाहन चालक २३ वर्षीय आशिष रमेश मीटपल्लीवार राहणार बोर्डा वरोरा ला ताब्यात घेतले, वाहन व बनावट मद्यसाठा असा एकूण १२ लाख १९ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला, या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सचिन पोलेवार वरोरा हे करीत आहे. 

Leave a Comment

+