सरकारी योजना आणि कायदेशीर सल्ला एकाच जागी! वरोराकरांसाठी खास बातमी

February 17, 2026 by Prakash Hande

Warora Vidhi Seva Camp : चंद्रपूर - राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चंद्रपूर व वरोरा तालुका विधीसेवा प्राधिकरण आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (चंद्रपूरच्या महापौरांची मुंबई वारी, मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट)

 

याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.16) आढावा बैठक घेण्यात आलीयावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी पी.पीकुलकर्णीमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहअतिरिक्त जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारवरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्केतहसीलदार योगेश कौटकरजिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेवरोरा येथे होणारे विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यात सर्व विभागांनी आपापल्या विभागाचे स्टॉल लावून नागरिकांमध्ये जनजागृती करावीजेणेकरून नागरिकांना योजनांबद्दल माहिती मिळेल आणि त्यांना त्याचा लाभ घेता येईल. Warora Vidhi Seva Camp

 

सदर महामेळावा हा 22 फेब्रुवारी रोजी स्वदादासाहेब देवतळे शेतकरी भवनसद्भवना चौकअभ्यंकर वॉर्डचंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागेवरोरा येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहेशासकीय योजनांची माहिती व त्याकरीता अर्ज करण्याची सुवर्ण संधी या मेळाव्यातून मिळणार आहेतसेच भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहेनागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांचा महामेळाव्याला भेट द्यावीअसे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

+