पोंभुर्णा हाणामारी प्रकरणातील घाटकुळ येथील घराच्या बांधकामाचा वाद

पोंभुर्ण्यात मामा-भाच्यात हाणामारी; परस्पर गुन्हे दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 27, 2026

पोंभुर्णा – पोंभुर्णा हाणामारी प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील घाटकुळ येथे मामा आणि भाच्यामध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. घराच्या बांधकामावरून आणि कवेलू काढण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोंभुर्णा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. मारहाण आणि धमकावल्याचे आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (ओबोसी वसतिगृहासाठी जमीन हस्तांतरण रखडले, वाचा बातमी)

घाटकुळमध्ये घराच्या बांधकामावरून वाद

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस ठाणे हद्दीतील घाटकुळ येथे घराच्या बांधकामावरून आणि कवेलू काढण्यावरून निर्माण झालेल्या वादातून मामा आणि भाच्यामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, या हाणामारीत दोन्हीकडील मंडळी जखमी झाली आहेत.

कवेलू काढण्यावरून मामा-भाच्यात वाद

प्राप्त माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी घाटकुळ येथील दयानंद उद्धव दुधे हे आपल्या नवीन घराचे प्लास्टर काम करत असताना, त्यांच्या आईच्या जुन्या घराचे कवेलू भिंतीजवळ येत असल्याने प्लास्टरला अडचण निर्माण होत होती. त्यामुळे कवेलूची एक ओळ काढत असताना त्यांचा भाचा राजेश्वर विलास दुर्गे तिथे आला आणि कवेलू का काढत आहेस, असा प्रश्न विचारत वाद घालू लागला. या वादातून दोन्ही बाजूंनी शिवीगाळ व मारहाण झाल्याचा आरोप आहे. एका बाजूच्या फिर्यादीनुसार, दयानंद दुधे, त्यांची पत्नी दर्शना दुधे आणि मुलगी सपना उंदीरवाडे यांना राजेश्वर दुर्गे याने अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि कुऱ्हाड दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या बाजूच्या फिर्यादीनुसार, राजेश्वर दुर्गे याने विचारणा केली असता मामा दयानंद दुधे, समीर दुधे, दर्शना दुधे आणि सपना उंदीरवाडे यांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. यादरम्यान समीर दुधे याने गळा दाबून धरला आणि दयानंद दुधे याने लोखंडी सलाखेने पाठीवर व हातावर वार करून गंभीर जखमी केले तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

या परस्परविरोधी घटनेची गंभीर दखल घेत पोंभुर्णा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. एका बाजूने राजेश्वर दुर्गे याच्याविरुद्ध मारहाण व धमकावल्याप्रकरणी गुन्हे नोंदवले गेले आहेत, तर दुसऱ्या बाजूने दयानंद दुधे, समीर दुधे, दर्शना दुधे आणि सपना उंदीरवाडे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व मारहाणीचे गुन्हे नोंदवून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक नागनाथ नैताम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कौटुंबिक व मालकी हक्काच्या कारणावरून झालेल्या या खुन्नशी संघर्षामुळे घाटकुळ गावात खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment