राजुरा – राजुरा मोपेड चोरी प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जवाहरनगर भागातून चोरीला गेलेली एक लाख रुपये किमतीची मोपेड जप्त करण्यात आली. राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. पोलीस पुढील तपास करत आहेत. (विजयादशमीच्या पूर्वसंध्येला पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, वाचा बातमी)
शहरात घरासमोरून पांढरी मोपेड दुचाकी चोरणाऱ्या एका चोरट्याला राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. दिपक मारोती उमरे (वय ३८ वर्षे, रा. माता मंदिर वार्ड, राजुरा, व्यवसाय मजुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली एक लाखाची मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे.
राजुरा मोपेड चोरीची तक्रार कशी नोंदवली गेली?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजुरा येथील जवाहरनगर भागात राहणारे फिर्यादी गोविंद मदत झाडे यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता ते ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या घरासमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची हिरो कंपनीची मेस्ट्रो दुचाकी (क्र. MH 34 BA 3464, अंदाजे किंमत १,००,००० रुपये) लांबवली होती. फिर्यादीच्या या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ अज्ञात चोरावर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकाने तपासाची चक्र वेगाने फिरवली. गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना राजुरा येथील गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी दीपक मारोती उमरे याला जवाहरनगर, राजुरा येथून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली १ लाख रुपयांची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, संजय चौधरी, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, गुडेराव पोले आणि राजीव दुबे यांनी पार पाडली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






