चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

Chandrapur encroachment
News34 chandrapur चंद्रपूर – मागील 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे, या कालावधीत तब्बल 12 जणांनी आपला जीव गमावला, या अपघातांची असंख्य कारणे आहे, मात्र शहरातील वेगात वाढणारे अतिक्रमण सुद्धा या अपघाताला तितकेच जबाबदार आहे.     यावर चंद्रपूर जिल्हा युवासेनेने गंभीर दखल घेत 8 दिवसांच्या आत प्रियदर्शिनी चौक ते ट्रायस्टार ...
Read more

चंद्रपूर शहरातील दुचाकी अपघातात 8 वा मृत्यू

चंद्रपुरात अपघाताची मालिका
News34 chandrapur चंद्रपूर – ऑक्टोबर पासून सुरू झालेले रस्ते अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून 16 नोव्हेम्बरला वरोरा नाका चौकात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. जटपुरा प्रभागातील नगीनाबाग येथे राहणारा 27 वर्षीय सोहेल शेख या युवकाचा रस्ते अपघातात नाहक बळी गेला.   गुरुवारी रात्री 10 ते साडेदहा वाजताच्या सुमारास सोहेल हा आपल्या मित्रांसोबत दुचाकी वाहन क्रमांक ...
Read more

चंद्रपूर मनपाची हद्दवाढ, ही गावे होणार समाविष्ट

Chandrapur Municipal Corporation's limit increase proposal
News34 chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर भूमिपुत्र युवा संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात चंद्रपूर शहराभोवतीच्या 13 किलोमीटर अंतरातील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही या प्रस्तावावर आक्षेप घेतो, असे संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना 2011 मध्ये झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिका ...
Read more

चंद्रपुरातील नागरिकांना महानगरपालिकेने केले महत्वाचे आवाहन

Chandrapur municipality appeal
News34 chandrapur चंद्रपूर  –  चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.   ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची ...
Read more

चंद्रपुरातील महिलांनी तयार केले दिवाळीचे फराळ

Chandrapur municipal corporation
News34 chandrapur चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे. सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य ...
Read more

चंद्रपूर मनपाच्या चांदा सिटी हेल्पलाईन वर तक्रारीचा डोंगर

Chanda city help line app
News34 chandrapur चंद्रपूर   – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मागील वर्षी करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद मिळाला असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या ४१७२ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी ४१५० तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.   चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा ...
Read more

चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण
News34 chandrapur चंद्रपूर: स्वच्छता हीच सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करून देशाची मोठी सेवा करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा यांनी दिले.   नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत ...
Read more

चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार

चंद्रपूर महानगरपालिका
News34 chandrapur चंद्रपूर: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य मा.डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉ.वावा यांनी दिले. या बैठकीस डॉ.वावा यांच्यासह मनपा आयुक्त श्री. ...
Read more

कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

घंटागाडी कामगार चंद्रपूर
News34 chandrapur चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले. कचरा ...
Read more

चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

घंटागाडी कामगार चंद्रपूर मनपा
News34 chandrapur चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.   शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, ...
Read more
error: Content is protected !!