Talodhi House Burglary प्रकरणातील घरफोडीचे प्रतीकात्मक दृश्य

Talodhi House Burglary । तळोधीत धाडसी घरफोडी, ६ लाखांचा ऐवज लंपास

User avatar placeholder
Written by Prakash Hande

May 29, 2026

Talodhi House Burglary : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी मध्ये धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकूण सोन्या-चांदीचे दागिनेसह तब्बल ६ लाख १२ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबविला. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (दहा मिनिटात महिलेचे मंगळसूत्र लांबवीले)

Talodhi House Burglary प्रकरणामुळे परिसरात खळबळ

३३ वर्षीय उमेश जगदीश पंचवटे यांच्या घरी हि चोरी झाली असून ते २३ मे रोजी कुटुंबासह पवनी भंडारा जिल्ह्यात नातेवाईकाकडे गेले होते, जाताना पंचवटे यांनी घरी व मेन गेटला कुलूप लावून गेले होते. २८ मे रोजी पंचवटे कुटुंबासह घरी परतले असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळले.

घरातील दरवाजा उघड होता, कुलूप दाराजवळ पडले होते, बेडरूमचा दार व आलमारी मधील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते, आलमारी मधील लॉकर खुले होते, त्यामधील ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने दिसून आले नाही.

पंचवटे यांनी दिलेल्या माहितीवरून एकूण ६ लाख १२ हजार ५४२ रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबविला, याबाबत पंचवटे यांनी तळोधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बीएनएस अन्वये कलम ३०५ (a), ३३१ (३) व ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment