वाघ शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वन अधिकाऱ्याला अटक

Tiger hunting news

News34

चंद्रपूर – 28 जून ला गुवाहाटी येथे आसाम वनविभाग व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणा राज्यातील 3 व्यक्तींना अटक करण्यात आली होती, त्यांचे कडून वाघाची कातडी व हाडे सुद्धा जप्त करण्यात आली होती.

तिन्ही आरोपीची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडून मिळालेली माहिती तपासात घेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो यांनी देशातील सर्व व्याघ्रप्रकल्प सभोवताल वाघांची शिकार होत असल्याच्या सूचना 29 जून ला देण्यात आल्या होत्या.

वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत वाघाच्या शिकार प्रकरणात तब्बल 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना देशातील विविध भागात झालेल्या वाघ शिकार व मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने संशयितांवर पाळत ठेवली होती,

तपासा दरम्यान शिकारी टोळक्यांचे दिल्ली येथील एका व्यक्तीचे आर्थिक संबंध असल्याची बाब उघडकीस झाली, त्या व्यक्ती वनविभागाला आधीच संशय होता मात्र पुराव्या अभावी त्याच्यावर कारवाई करणे शक्य नव्हते मात्र या माहितीच्या आधारे वनविभागाने तपासाला गती देत 81 वर्षीय मसराम जाखड ला त्याच्या राहत्या घरून द्वारका दिल्ली मधून अटक करण्यात आली.

मसराम जाखड हे दिल्ली वनविभागातील निवृत्त वनाधिकारी आहे, बऱ्याच वर्षांपासून जाखड यांचे शिकारी टोळक्यासोबत घनिष्ठ संबंध ठेवत आर्थिक लाभ घेत होता,  महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपासाद्वारे जाखड यांचे शिकारी टोळीसोबत असलेले आर्थिक संबंध उघड केले.

आजही अनेक शिकारी टोळक्यासोबत जाखड यांचे संबंध असल्याने देशातील विविध भागात सक्रिय असणारे शिकारी यांच्यावर कारवाई करणे वनविभागाला सोयीचे असणार आहे.

आरोपीची चौकशी केली असता सावली वनपरिक्षेत्र मध्ये वाघाची शिकार केली असल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे, माहितीच्या आधारे नव्याने वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुवाहाटी येथे कारागृहात असलेल्या 3 आरोपीना पुढील 2 दिवसात महाराष्ट्र वनविभाग आपल्या ताब्यात घेणार आहे. आजपर्यंत या वाघ शिकार प्रकरणात एकूण 19 आरोपींचा समावेश दिसून आला आहे, तपासाअंती आरोपींची संख्या वाढणार आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!