News34 chandrapur
चंद्रपूर – News34 च्या बातमीनंतर जिल्ह्यातील नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर प्रशासनाने फास आवळण्याचे काम सुरू केले आहे, मात्र आजही या जुगाराला युवक बळी पडत आहे, वरोरा येथे व्हिडीओ गेम खेळून पैसे हरलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
25 सप्टेंबरला रविवारी दुपारी 12 वाजता 34 वर्षीय नीरज मेश्राम यांनी कमाईचे पैसे व्हिडीओ गेम पार्लर मध्ये जाऊन हरला, त्याला पार्लर मध्ये आधीपासून गेम खेळण्याचा छंद होता, या छंदाने त्याच्यावर बँकेचे कर्ज सुद्धा झाले होते, आपण गेम खेळून काही पैसे जिंकू व बँकेचे कर्ज फेडु अशी भावना नीरज च्या मनात होती मात्र तो पैसे हरला आणि नैराश्यापोटी त्याने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली.
आझाद वार्डात राहणारा नीरज हा रत्नमाला चौकात मुरमुरे व चणे फुटाणे विकायचा, काही पैसे मिळाले को तो सरळ व्हिडीओ गेम पार्लर मध्ये जायचा, यामध्ये त्याने अनेकदा पैसे सुद्धा हरले, दुचाकी वाहन घेण्यासाठी त्याने बँकेतून कर्ज काढले होते, मात्र ते पैसे सुद्धा नीरज व्हिडीओ गेम पार्लर मध्ये हरला.
आता बँकेचे कर्ज कसे फेडणार ही बाब त्याला खटकू लागली, यामुळे तो मानसिक तणावात गेला आणि रविवारी रेल्वेखाली उडी घेऊन नीरज ने आत्महत्या केली. नीरज च्या पत्नीने व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याची मोहीम सुरू केली आहे, मात्र आधीच परवाने नूतनीकरण नसल्याने या तपासणी नंतर कारवाई काय होणार यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या जुगाराने अनेकांचे संसार उध्वस्त केले आहे, विशेष म्हणजे काही गेम पार्लर चालकांनी व्हिडीओ गेम खेळल्यानंतर पैसे न दिल्याने अनेकांच्या मालमत्ता हिसकावल्या आहे, नागरिकांना मूर्ख बनवून अनेक गेम पार्लर संचालकांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ज्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त झाल्या आहे त्यांनी पुढे यायची विनंती केल्यास असंख्य नागरिक जिल्हाधिकारी यांच्यापुढे हजर होतील.