चंद्रपूर जिल्ह्यात गजराज ची एन्ट्री

News34 प्रशांत गेडाम

नागभीड – उडीसा राज्यातून छत्तीसगडमार्गे काही महिन्यांपूर्वी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला. कळपाने धानोरा, आरमोरी, वडसा, कोरची परिसरात धुमाकूळ घातला होता.

 

कळपातील भरकटलेला हत्ती नागभीड वनपरिक्षेत्रातील गोवारपेठ व तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली या परिसरात दिसला. नागभीड व तळोधी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या जंगलालगतच्या गावांत वाघ, बिबट, रानगवे, अस्वलाची दहशत असतानाच हत्तीने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांत भीती पसरली आहे.

सात-आठ दिवसांपासून गोवारपेठ, देवपायली, नवेगाव, हुडेश्वरी या परिसरात हत्तीचा वावर आहे. हत्ती धानपिकाचे नुकसान करीत आहे. हा हत्ती मनुष्यावरही हल्ला करू शकतो. भटकलेला हत्ती एकारा जंगल परिसरातून आवळगाव, मुडझा, नवेगाव, हुंडेश्वरी, देवपायली जंगल परिसरातून आला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी – सालकर

नवेगाव, हुंडेश्वरी, देवपायली हत्ती दाखल झाला याची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिलेली आहे . वन विभाग अधिकारी कर्मचारी त्याच्यावर निगरानी ठेवत असून सतर्क आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!