Monday, June 17, 2024
Homeग्रामीण वार्तासंघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

सिंदेवाही येथे नगर तेली समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार व प्रबोधन सोहळ्याचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

सिंदेवाही – आज राज्यात आरक्षणाचा मुद्दा घेऊन विविध समाजांनी रणकंदन फुंकले आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता समाजाचे एक मूठ होऊन संघटन करणे गरजेचे असून संघटनात्मक बांधणीतूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती महोत्सवानिमित्त विदर्भ तेली महासंघच्या नगर तेली समाज सिंदेवाही च्यावतीने आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.

 

 

आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार,तर अध्यक्ष म्हणून केंद्रीय अध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंघ रघुनाथजी शेंडे, तेली समाज हितकारणी मंडळ नागपूर अध्यक्ष प्रशांत कामडे, किशोर वरंभे, विदर्भ तेली महासंघ चंद्रपूर उपाध्यक्ष डॉ. विश्वास झाडे, ॲड. रमेश पिसे, प्रा. विठ्ठलराव निकुरे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, डॉ. पद्मजा वरभेमाजी नगराध्यक्ष आशा गंडाते, मंगेश मुंगले, योगराज कावळे, भूपेश लाखे, रामदास भरडकर, अल्का कावळे, सिमाताई सहारे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पुरवतात संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनेनंतर समाजातील गुणवंत व प्रतिभावंत यांचा सत्कार करण्यात आला.यात तानिया लोहबरे, कक्षिनी आसेकर, उपस्थी कावळे, धनराज ठाकरे, अमित भरडकर, प्रियंका चीलबुले, ओजस देवतळे, शुभम पिसे, धनश्री लाखे, सारंग माकडे, डॉ. प्रज्वल अगडे, डॉ. श्रद्धा आगडे, सिद्धी पाकमोडे, वनश्री राखडे, डॉ. प्रियंका कामडी, हेमा गंडाते, डॉ. आद्वाध वरभे, डॉ. निखिल कामडी, कृतिका मुळे, रोहिणी घुगुस्कर, योगेश नासरे, चंदू गंडाते यांचा समवेश आहे.

 

यानंतर पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, समाजाला पूर्णतः शिक्षित केल्याशिवाय समाजाचा विकास होणे शक्य नाही. शिक्षित समाज हा देशाच्या उन्नतीचा कणा आहे. म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध असल्याचे म्हटले आहे. सिंदेवाही नगरीत तेली समाज फार मोठ्या संख्येने असून तेली समाजाच्या समाजभावनाकरिता जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रत्येक समाजाने सेवा परमो धर्म या ब्रीदाप्रमाणे मानव सेवेला महत्त्व देऊन आपली जीवन सार्थकी करावे. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर ॲड.रमेश पिसे यांनी मार्गदर्शन पण बोलताना सांगितले की, देशाच्या उच्चस्त पदावरही तेली समाजाने नेतृत्व केल्यानंतरही तेली समाजा अद्यापही उपेक्षितच आहे. देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या तेली समाजाला अजूनही योग्य नाही मिळत नसून समाजाचे प्रश्न अधांतरीच रखडले आहे. यानंतर नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी केली समाज भवन बांधकामा करिता दोन लक्ष रुपये देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश आसेकर व किशोर कावळे यांनी तर प्रास्ताविक अल्का कावळे यांनी केले. यावेळी सिंदेवाही नगरीतील संपूर्ण तेली समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

 

संताजीच्या जयघोषाने सिंदेवाही नगरी दुमदुमली…

 

आज सिंदेवाही येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त शहरातील गुरुदेव चौक ते श्रवण लॉन या कार्यक्रम स्थळापर्यंत पद यात्रेतून वारी काढण्यात आली. या वारीचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांचे वारकरी संप्रदाय भजन मंडळ, बाल गोपालांची विविध वेशभूषा, मराठमोळ्या पहिराव्यात महिलांच्या डोक्यावरील कलश पदयात्रा, मुलींची लेझीमची तालबद्ध चमू व पुरुषांचे हाती असलेले ध्वज व संताजी महाराजांची प्रतिमा आणि वारीतील प्रत्येक व्यक्तींकडून होणारा संताजी महाराजांचा जयघोष हे विशेष आकर्षण ठरले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!