Friday, March 1, 2024
Homeचंद्रपूरमहिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर

माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : सर्वच क्षेत्रात महिलांनी समोर येऊन प्रभावीपणे काम करावे. हि धारणा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची आहे. राजकारणात देखील महिलांनी सक्रिय होऊन काम करण्यासाठी त्या सातत्याने महिलांना आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला साद देत अनेक महिला काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय काम करीत आहेत. चंद्रपूर येथील धानोरकर जनसंपर्क कार्यालयात माजी शिक्षण मंत्री तथा आमदार वर्षाताई गायकवाड, आमदार प्रतिभाताई धानोरकर तसेच महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर यांच्या प्रमुख उपस्थिती महिला काँग्रेस बल्लारपूर विधानसभेची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी संदीप कुमार जी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, शहर काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा तालुका अध्यक्ष रवी मरपल्लीवार, जिल्हा काँग्रेस महिला उपाध्यक्ष वैशाली पुल्लावार, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष हेमंत आरेकर, युवा नेते आशिष अहिरकर, अंशुल मोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी  शोभा नंदू कुमरे, वैशाली पुल्लावार यांची जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष  पदावर तर छबूताई वामन पावडे, वंदना शत्रुघ्न उईके, किशोरी विकास मशाखेत्री, सुशिला प्रभाकर कुळमेथे, मंगलाताई दादाजी आत्राम, शोभा प्रकाश महाजनवार, प्रेमिला गोविंदा रोहणकर, रिना रंजीत मारबोनवार यांची जिल्हा महिला काँग्रेस महासचिव म्हणून तर संगीता विनायक बुरांडे, रोशना लोंढे, शिल्पा विनोद ठाकरे, प्रिती नरेश भांडेकर, कविता किशोर नंदीग्रामवार, विनता नितेश रायपुरे, नलिनी थेरकर यांची जिल्हा महिला काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular