News34 chandrapur
चंद्रपूर : काँग्रेसने नेहमी गरिबांना साथ दिली आहे. विविध योजना त्यांचेसाठी चालू केल्या व त्या आजही सुरु आहे. त्या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे. कॉग्रेसचा हात गरिबांसोबत तसेच तळागळातील जनतेसोबत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी केले.
काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इटोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप कार्यक्रमात उद्धघाटक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण तालुका अध्यक्ष बल्लारपूरचे गोविदा पाटील उपरे यांचेसह ओबीसी नेते सचिन राजूरकर, इटोलीचे सरपंच तुळशीराम पिपरे, कटवलीचे सरपंच राजू ढुमणे, उपसरपंच नरेश बुरांडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर, शाळा समितीचे अध्यक्ष नागेश दुधबडे, माजी सरपंच वासुदेव येरगुडे, धाडुजी दुधबडे, सदस्य दयालवार, आदी मान्यवरांची उपस्स्थिती होती.
पुढे बोलताना चोखारे म्हणाले कि, सदर कार्यक्रमाचे माध्यमातून गरजू पर्यंत पोहचने व गोरगरीबाना वेळोवेळी साथ देणे हाच मुख्य हेतू ठेऊन काँग्रेस समोर जात आहे. आपण काँगेस सोबत उभे राहावे, आम्ही सदैव आपल्या सोबत असून कॉग्रेसचा हात गरिबांसोबत आहे . यासमोर गावातील विकासाला चालना देऊ. शाळेतील सोयीसुविधेसाठी सर्वोतोपरी प्रयन्त करू, येत्या काळात प्रशिक्षण कार्यक्रम राबवू त्यामाध्यमातून इतराना प्रशिक्षण मिळेल. असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात शाळेतील विद्याथ्यांना बुक वाटप करण्यात आले.तसेच इटोलीसह बल्लारपूर तालुक्यातील १५ – २० गरजू महिलांना शिलाई मशीन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यात सुनीता विजय वाळके, संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर, अर्चना गजानन रेनकूटवार रा. कळमना बल्लारपूर,चंदा सुधाकर घोंडे रा. पळसगाव बल्लारपूर, मंजू रामचंद्र वासमवार वॉर्ड ना. ०४, नया वस्ती, कोठारी , अर्चना देविदास गडकर रा. काटवली , बल्लारपूर, प्रभा रुंभी उपरे रा. कवडजाई बल्लारपूर , छाया राजू कुनघाडकर, रा. मानोरा बल्लारपूर, सविता सतीश चलाक रा. इटोली बल्लारपूर, वनिता अविनाश पेंदोर रा. मोहाली तुकूम बल्लारपूर, सुवर्णा रामू मरस्कोल्हे रा. किन्ही बल्लारपूर, पूजा प्रशांत (मुन्ना) गेडाम रा. कोर्टीमक्ता बल्लारपूर, ज्योत्सना संजय गोंधळी रा. बामणी बल्लारपूर,पुष्पा मारोती काळे रा. आमडी , बल्लारपूर, मनीषा अतुल सोनटक्के रा. नवी दहेली बल्लारपूर, वर्षा राजू गजभिये रा. जुनी वस्ती, कला मंदिर बल्लारपूर या गरजू महिलांचा सहभाग आहे.
या कार्यक्रमात बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक चिंद्यालवर यांनी केले.