Chandrapur Yuvasena : चंद्रपुरातील युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

News34 chandrapur

चंद्रपूर – राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस होणारा बदल व सध्याची परिस्थिती बघता युवकांचा कल शिवसेना ठाकरे गटाकडे वाढत आहे. Chandrapur yuvasena

 

चंद्रपुरातील वडगाव येथील अनेक युवकांनी रविवारी शिवसेना प्रणित युवासेनेत प्रवेश केला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना कार्यालयात पार पडला. Chandrapur politics

 

 

शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे उपशहर प्रमुख स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वात वडगाव येथील युवकांनी जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला, यावेळी सहारे यांनी उपस्थित युवकांच्या गळ्यात दुपट्टा टाकत स्वागत केले.

 

 

यावेळी राहुल वाढई, मयूर येरगुडे, प्रतीक कोकांडे, शिवम बलकी, श्रेयश देवाळकर, मोहम्मद शेख, आकाश बलकी, महेश देरकर, सौरभ भोयर, अंकित वैद्य, गिरीश रामटेके, आर्यन निमकर, सूरज बलकी, प्रतीक बोरीकर, रोहित मडावी व शुभम बलकी यांनी प्रवेश केला.

 

आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात युवासेना शहर प्रमुख शाहबाज शेख, गणेश ठाकूर, शाहरुख शेख, चेतन भाऊ व अनिकेत चंदनखेडे यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!