Thursday, April 25, 2024
Homeग्रामीण वार्ताCISF jawan died in fire : चंद्रपुरात भीषण अपघात

CISF jawan died in fire : चंद्रपुरात भीषण अपघात

- Advertisement -
- Advertisement -

CISF jawan dies in fire
भद्रावती – नागपूर – चंद्रपूर या रस्त्यावरून प्रवास करीत असताना भरधाव वेगात कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली, कार ने पेट घेतल्याने आगीत होरपळून कार चालकाचा मृत्यू झाला. 8 मार्च ला सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

 

35 वर्षीय दीपक चरण बघेल असे मृतकाचे नाव आहे, मृतक हा CISF जामनगर गुजरात येथे कार्यरत होता, काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता, दीपक भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी, सुमठाणा येथे राहत होता. CISF jawan dies in fire

वाचा – चंद्रपूर लोकसभेचा हा आहे कांग्रेस उमेदवार

दीपक हा काही दिवसांपूर्वी रजा घेऊन भद्रावती येथे आला होता, मात्र काही कामासाठी तो नागपूरला गेला होता, 8 मार्च ला मध्यरात्री तो परत भद्रावती येथे होता.

 

पहाटे ची वेळ असल्याने त्याचे चारचाकी वाहन क्रमांक 23BH-6855C हे अतिवेगात होते, भद्रावती जवळ पोहचताच त्याचे वाहनवरील नियंत्रण सुटले, सकाळी 6 वाजता दरम्यान कोंढा नाल्याजवळील पुलाच्या कठड्याला धडक देत वाहन खाली कोसळले. CISF jawan dies in fire

 

दीपक ने वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेर पडू शकला नाही, तितक्यात शॉर्ट सर्किट झाल्याने कार ने पेट घेतला, यामध्ये दीपक चा आगीत होरपळून मृत्यू झाला.

 

सकाळी 8 वाजता गावातील नागरिकांना वाहन व अर्धवट जळाळेला मृतदेह आढळल्याने त्यांनी सदर माहिती भद्रावती पोलिसांना दिली, माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला, घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!