Dr.Gavture joins congress : चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठा उलटफेर

Dr.Gavture joins congress चंद्रपूर – ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये चंद्रपुरातील सामाजिक कार्यात व बहुजन चळवळीत अग्रेसर असलेले गावतुरे दाम्पत्य यांनी आज कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मध्ये कांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

हे ही वाचा : लव्ह जिहादच्या नावाने चंद्रपुरात व्हिडीओ व्हायरल, तो व्हिडीओ शेअर करू नका, चंद्रपूर पोलिसांचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

भाजप पक्ष दररोज विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश करवून घेत आहे, मात्र डॉ. गावतुरे यांच्या प्रवेशाने चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कांग्रेसचे पारडे जड होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. Dr.Gavture joins congress

हे ही वाचा : चंद्रपुरात आचारसंहितेचा झोल, माजी नगरसेवकाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आव्हान

गावतुरे दाम्पत्य मागील 15 वर्षांपासून चळवळी मध्ये सक्रियपणे काम करीत आहे, कोरोना काळात गावतुरे दाम्पत्यानी सामाजिक बांधिलकी जोपासत बाधित नागरिकांची सेवा केली. Dr.Gavture joins congress

हे ही वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात, तुमचा उजवा हात माझ्यावर घाणेरडी टीका करतोय, थांबवा त्याला, अन्यथा पुढच्या वेळेस मी मदत करणार नाही 

बालरोगतज्ज्ञ डॉ.अभिलाषा गावतुरे व पॅथॉलॉजीस्ट डॉ. राकेश गावतुरे यांच्या कांग्रेस पक्षात प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारणाला नवी कलाटणी मिळणार हे नक्कीचं.

 

कोण आहे डॉ. अभिलाषा गावतुरे व डॉ. राकेश गावतुरे ?

गावतुरे दाम्पत्यांचे गेल्या पंधरा वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुजन चळवळीमध्ये तसेच ओबीसी चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. 2020 च्या संविधान दिनी निघालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी मोर्चाचे नेतृत्व केले.

 

आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोना काळामध्ये डॉ अभिलाषा गावतुरे यांनी दिलेली निस्वार्थ सेवा याची दखल तर केवळ महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय मीडियाने सुद्धा घेतली होती. त्यांच्या भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन असो कामगारांचा हक्काचा लढा असो वा गाव तिथे वाचनालय ही मोहीम असो ,महिला सक्षमीकरणाची चळवळ असो ,चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबीराच्या मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा देणे, तसेच बाल रोग तज्ञांच्या संघटनेचे सचिव असताना कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांचा मोफत उपचार आणि संगोपन करण्याचे मोठे कार्य असो, वन्यजीव प्राण्यांच्या संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा प्रश्न उचलून धरणे, आदिवासींच्या हक्काच्या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या मुळे जिल्हाभरातील विशेष करून बल्लारपूर मुल विधानसभेमधून त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग निर्माण झालेला आहे.

 

डॉ राकेश गावतुरे यांचे वडील हे काँग्रेस सेवा दलाचे आजीवन सदस्य आहेत त्यामुळे डॉ राकेश गावतुरे यांना सामाजिक बांधिलकीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने ते काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान वाचवण्याच्या लढाईत अग्रणी शिलेदाराच्या भूमिकेत असतील याची चर्चा समाजातील सर्व स्तरातून होत आहे. या बातमी मुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे . गावतुरे दाम्पत्याच्या काँग्रेस प्रवेशाने चंद्रपूर लोकसभेतील समीकरणे नक्कीच बदलतील अशी काँग्रेस कार्यकर्त्यांना आशा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!