Brahmapuri Missing Girl । चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Brahmapuri Missing Girl : ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याची मालिका सुरूच आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातून पुन्हा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानकपणे बेपत्ता झाली असून मुलीच्या आईने याबाबत अज्ञाताने मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. (बाबुपेठमध्ये अडीच लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, पती-पत्नीवर गुन्हा दाखल)

Brahmapuri Missing Girl प्रकरणामुळे जिल्ह्यात चिंता

चंद्रपूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण हे Brahmapuri तालुक्यात आहे, ९ मे रोज मुलीची आई जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असताना मुलगी मावशीकडे गेली होती. मुलीची लहान बहीण हि आजी आजोबांकडे राहते.

१५ मे रोजी लहान मुलीने आईला फोनद्वारे माहिती दिली कि ताई हि गावी आली, त्यामुळे दोन्ही मुली आई-आजोबा कडे राहत होत्या. २७ मी रोजी लहान मुलीने आईला फोन करीत सांगितले कि २५ मे रोजी दुपारी २ वाजता मोठी बहीण मावशीकडे जातो म्हणून घरी निघाली. २६ मे ला मावशी ला याबाबत विचारणा केली असता ती घरी आली नाही असे सांगितले.

आई ने तात्काळ गावात येत, शेजारी व मुलींच्या मैत्रिणींना मुलींबाबत विचारले मात्र तिचा काही पत्ता लागला नाही. मुलगी अल्पवयीन असल्याने तिला कुणीतरी अज्ञाताने फूस लावून पळविले असा संशय व्यक्त करीत मुलीच्या आईने Brahmapuri पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

Leave a Comment