Ballarshah Railway Leopard Accident Spot and Report

बल्लारशा काजिपेठ रेल्वे लाईनवर धडक; ४ वर्षे वयाच्या बिबट्याचा जागीच मृत्यू

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 8, 2026

राजुरा / बल्लारपूर: Ballarshah Railway Leopard Accident संदर्भात एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. बल्लारशा ते काजिपेठ रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत ४ ते ५ वर्षे वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना मुर्ती नियतक्षेत्रातील पोल क्रमांक १५२/२६ जवळ घडली. रेल्वे रुळावरून जात असताना बिबट्याच्या डोक्याला तीव्र धडक बसली. यामुळे न्यूरोलॉजिकल शॉक बसून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. वन विभागाने या प्रकरणी वनगुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार)

बल्लारशा ते काजिपेठ दरम्यानच्या रेल्वे मार्गावर अज्ञात रेल्वेच्या जोरदार धडकेत एका अंदाजे ४ ते ५ वर्षे वयाच्या नर बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:१६ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली.

प्राप्त प्राथमिक अहवालानुसार, नियतक्षेत्र मुर्ती येथील कक्ष क्रमांक ५९० मधील बल्लारशा-काजिपेठ रेल्वे डाऊन लाईनवर, पोल क्रमांक १५२/२६ जवळ हा अपघात घडला. रेल्वे रुळावरून जात असताना बिबट्याच्या डोक्याला रेल्वेची तीव्र धडक बसली. या धडकेमुळे झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकने (Neurological Shock) बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी वन विभागाने वनगुन्हा क्रमांक ०८८८९/२२२३०० नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

नियम आणि उपस्थितीत दहन घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्याचे शवविच्छेदन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय राजुराचे सहाय्यक आयुक्त डॉ. एन. पी. तेलंगे आणि देवाडा येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. के. एल. कांगटे यांनी केले.

शवविच्छेदनानंतर वन्यप्राणी बिबट्याचे शव मध्यवर्ती रोपवाटिका, सुमठाणा येथे नियमानुसार आणि वरिष्ठ वनअधिकाऱ्यांच्या समक्ष जाळून त्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात आली. वन्यजीवांच्या रेल्वे अपघातातील या मृत्यूमुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment