Chandrapur FDA Raid Ramnagar Pan Shop Scented Tobacco Seized

चंद्रपूरच्या रामनगर चौकात FDA चा छापा; पानठेल्यातून हुक्का तंबाखू जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 4, 2026

चंद्रपूर: Chandrapur FDA Raid अंतर्गत चंद्रपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. रामनगर चौक, दाताळा रोड परिसरातील एका पानठेल्यावर अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तेथे बंदी असलेला सुवासिक हुक्का शीशा तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. (हे हि वाचा – चंद्रपूर-नागपूर मार्गावर गांजा विक्री, महिलेवर गुन्हा दाखल)

या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी एका विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.

Chandrapur FDA Raid : रामनगर चौकात अचानक तपासणी मोहीम

चंद्रपूर शहरातील रामनगर चौक, दाताळा रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने एका पानठेल्यावर अचानक धाड टाकून बंदी असलेल्या सुवासिक हुक्का शीशा तंबाखूचा साठा जप्त केला आहे. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्यावर पूर्ण बंदी घातलेली असतानाही खर्रा तयार करण्यासाठी या तंबाखूचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी एका पानठेला विक्रेत्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

पानठेल्यावर आढळला प्रतिबंधित हुक्का शीशा तंबाखू

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल गोपाल मुळे (वय ३० वर्षे) यांनी एका पंचासमक्ष रामनगर चौक, दाताळा रोड येथील पानठेल्याची तपासणी केली. या तपासणीदरम्यान पानठेल्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या ‘मजा १०८ हुक्का शीशा तंबाखू’ (प्रत्येकी ५० ग्रॅम) चे ६ डब्बे आढळून आले. एकूण ३०० ग्रॅम वजनाचा हा साठा १ हजार ७१० रुपये किमतीचा असून अधिकाऱ्यांनी त्याचा वास घेऊन तो प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असल्याची खात्री केली.

या कारवाईदरम्यान पानठेल्यावर विक्री करत असलेला विक्रेता शुभम दिलीप पडाल (वय ३१ वर्षे, रा. झिंगोजी वॉर्ड, भद्रावती, जि. चंद्रपूर) याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशी दरम्यान संबंधित विक्रेत्याने हा प्रतिबंधित तंबाखू पानठेल्यावर खर्रा तयार करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. तसेच या साठ्याबाबतचे कोणतेही खरेदी बिल किंवा पुरवठादाराची माहिती तो देऊ शकला नाही. तपासणीनंतर संपूर्ण मुद्देमाल कायदेशीररीत्या जप्त करून त्याचा अनौपचारिक नमुना पुढील प्रयोगशाळा विश्लेषणासाठी सुरक्षित ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने १३ जुलै २०२६ च्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व खर्रा यांच्या उत्पादन, साठा, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. सुगंधित तंबाखूच्या सेवनाने कर्करोग व गंभीर आजार होण्याची शक्यता असल्याचे माहीत असूनही हा घातक साठा विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी कुणाल मुळे यांच्या लेखी तक्रारीवरून शुभम पडाल याच्यावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment