चंद्रपूर: चंद्रपूर अवैध देशी दारू जप्त करण्याची मोठी कारवाई पोलिसांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी केली. रामनगर हद्दीतील बल्लारशाह बायपास रोडवर किशोर इलेक्ट्रॉनिक्स समोर सापळा रचण्यात आला. गोपनीय माहितीवरून पांढऱ्या मिट्सुबिशी पजेरो वाहनाची तपासणी झाली. त्यात ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० एमएलच्या ५०० बाटल्या सापडल्या. दारू आणि वाहन मिळून ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. बल्लारशाह येथील २५ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. (चंद्रपुरात कुंटणखान्यावर धाड, महिला दलालांना अटक, वाचा हि बातमी)
चंद्रपूर अवैध देशी दारू जप्त: बल्लारशाह बायपासवर सापळा
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बल्लारशाह बायपास रोडवर सापळा रचून ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान संशयितरीत्या जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या मिट्सुबिशी पजेरो चारचाकी वाहनाला थांबवून तपासणी केली असता, त्यात बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जाणारा देशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनातून ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० एमएल क्षमतेच्या ५०० देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या, ज्यांची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. याशिवाय दारू तस्करीसाठी वापरण्यात आलेली तब्बल ५ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची पजेरो कार (क्रमांक AP 28 BW 0828) असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागीच हस्तगत केला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मरपल्ली गणेश गौंड व्यंकटेश गौंड (वय २५ वर्षे, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर) याला वाहनासह ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी उपविभाग चंद्रपूर पथकाने बजावली असून, परिसरातील अवैध धंद्यांवर यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






