चंद्रपूर: चंद्रपूर शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांना धक्का दिल्याच्या आरोपावरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पंत हॉस्पिटलसमोर २७ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ही घटना घडली. गस्तीवर असलेले पोलीस हवालदार वादाची माहिती मिळताच घटनास्थळी गेले.
तेथे गणेश मंडळाच्या मुलांना मारहाण सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. मध्यस्थी करताना एका इसमाने पोलिसांवर धावून जात धक्का दिला आणि धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांची अतिरिक्त गाडी येताच तो वाहनातून पसार झाला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे. (डेटिंग ऐप वर ११ लाखाचा गंडा, वाचा हि बातमी)
शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर धावून जात त्यांना धक्का मारल्याची आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात घडली आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील पंत हॉस्पिटलसमोर ही घटना घडली असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात डी.एन.आर. ट्रॅव्हल्सचा मालक लाली याच्या मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर शासकीय कामात अडथळा : पंत हॉस्पिटलसमोर काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ च्या रात्री रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण शेषराव सोनटक्के आणि पोलीस हवालदार मंगेश सायकार हे द्वितीय ड्युटी अधिकारी म्हणून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत कर्तव्यावर होते. रात्री ११ च्या सुमारास चंद्रपूर ते नागपूर रोडवरील पंत हॉस्पिटल समोर जोरदार भांडण व वाद सुरू असल्याची माहिती फोनद्वारे पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलीस कर्मचारी तातडीने शासकीय वाहनाने घटनास्थळी पोहोचले.
गणेश मंडळाच्या मुलांना मारहाण, पोलिसांची मध्यस्थी
घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेथे २ ते ३ पगडी घातलेले इसम गणेश मंडळाच्या मुलांना मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस हवालदार प्रवीण सोनटक्के व त्यांच्या सहकाऱ्याने मध्यस्थी करत गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि मारहाण करणाऱ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील पगडी घातलेल्या एका इसमाने पुन्हा गणेश मंडळाच्या मुलास मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला अटकाव केला असता, त्या इसमाने थेट कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदाराच्या अंगावर धावून जात त्यांना जोरात धक्का दिला. एवढ्यावरच न थांबता “तुम क्या कर लेते, कर लो, मै देख लुंगा” अशी उघड धमकी पोलिसांना दिली.
त्याच वेळी पोलिसांची अतिरिक्त गाडी येत असल्याचे पाहून आरोपीने तात्काळ आपली गाडी काढली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांवर धावून जाणारा आणि धमकी देणारा इसम हा डी.एन.आर. ट्रॅव्हल्सचा मालक लाली याचा मुलगा असल्याचे तेथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितले.
शासकीय कर्तव्य बजावत असताना पोलिसांवर धावून जाणे, धक्का मारणे आणि धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रवीण सोनटक्के यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, २२१ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अश्विनी श्यामराव वाकडे यांच्याकडे सोपवण्यात आला असून फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






