पोंभुर्णा – Pombhurna Police Crime News अंतर्गत पोंभुर्णा शहरात पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला अश्लील शिवीगाळ करण्यात आली.
सावित्रीबाई फुले चौकात हा संपूर्ण प्रकार घडला. ठाणेदार आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसमोर आरोपीने शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला अश्लील शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद परशुराम पेंदोर (वय ५०, रा. पोंभुर्णा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (हे हि वाचा हद्दपारीचा आदेश धुडकावला, आरोपीला अटक)
Pombhurna Police Crime News: गस्तीवरील पोलिसांशी गैरवर्तन
पोंभुर्णा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल ठेंगणे, पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील आणि पोलीस हवालदार पंजाबराव वडगुजी मडावी हे पथक ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास परिसरात पेट्रोलिंग करत होते. रात्री सव्वादहा ते साडेदहाच्या सुमारास पोलीस पथक पोंभुर्णा येथील सावित्रीबाई फुले चौकात पोहोचले असता, रस्त्याच्या मधोमध एक व्यक्ती दारूच्या नशेत उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या चेहऱ्यावर व शरीरावर मार लागल्याच्या खुणा होत्या आणि त्याने आपली मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी अशी उभी केली होती, ज्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.
समजावून सांगणाऱ्या पोलिसांवरच भडकला मद्यधुंद इसम
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि हवालदार मडावी यांनी वाहनातून खाली उतरून त्या व्यक्तीला वाहनांची अडचण दूर करून घरी जाण्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, समजावून सांगणाऱ्या पोलिसांवरच तो व्यक्ती भडकला आणि त्याने “मला विचारणारे तुम्ही कोण?” असा जाब विचारत ड्युटीवर असलेल्या पोलिसांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वारंवार शांत राहण्याचे आवाहन करूनही संबंधित व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता; उलट त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शासकीय कामात थेट अडथळा आणला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात विचारपूस केली असता त्याने आपले नाव विनोद परशुराम पेंदोर असल्याचे सांगितले.
या प्रकरणी पोलीस हवालदार पंजाबराव मडावी यांच्या लेखी तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी आरोपी विनोद पेंदोर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३२ (शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला किंवा कामात अडथळा), २२१ (सार्वजनिक सेवकाच्या आदेशाचा अवमान/कामात अडथळा), २९६ (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य/शिवीगाळ) आणि २८५ (सार्वजनिक मार्गावर अडथळा किंवा धोका निर्माण करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई अंकुश मानधडे (बकल नंबर २६४५) करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






