Korpana Police Tobacco Raid action in Chandrapur

कोरपना येथे ३.१८ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त; पोलिसांची धडक कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 25, 2026

चंद्रपूर – Korpana Police Tobacco Raid अंतर्गत कोरपना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कान्हाळगाव फाट्यावर नाकाबंदी दरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सुगंधी हुक्का शीशा पॉकेट आणि ईको गाडीचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन राबवण्यात आले. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील ५ सराईत गुन्हेगार तडीपार)

याप्रकरणी पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी यांच्या आदेशावरून काल रात्री २१:०० ते ००:०० वाजतापर्यंत कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू होती. रेकॉर्डवरील आरोपी व संशयीत वाहने चेक करणे करिता गोपनीय माहितीच्या आधारे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांना एका ईको गाडीने (वाहन क्र एम.एच.३४ सी.डी.९१९०) कोरपना येथे सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा कान्हाळगाव फाटा येथे नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी सदर ईको गाडीस थांबवून तिची झाडाझडती घेतली. यावेळी वाहनामध्ये पोलिसांना १० सुगंधित हुक्का शीशा पॉकेट आढळून आले. या सुगंधित हुक्का शीशा पॉकेटची अंदाजे किंमत १८,०००/- रुपये आहे. तर ईको वाहनाची अंदाजे किंमत ३,००,०००/- रुपये आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ३,१८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ३०(२),२६(२)(ए),५९(१),३,४ अन्वये कोरपना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. कोरपना पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे सुगंधित तंबाखू विक्रीवर आळा बसेल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सटवा नामपल्ले, पोलीस हवालदार विशाल मोरे, पोलीस हवालदार लक्ष्मण नुनुंचे यांच्या पथकाने केली.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment