नागभिड / चंद्रपूर: Nagbhid POCSO Case प्रकरणात चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली. १३ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने हा निकाल जाहीर केला. (हे हि वाचा – चंद्रपुरात बनावट घड्याळाचा साठा जप्त)
नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात घडलेल्या या घटनेत, नराधम आरोपी याने त्याची पत्नी बाहेर गावी गेल्याचा फायदा घेऊन आपल्याच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केले. मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यात आले होते. या अत्याचारामुळे पीडित मुलगी ही आश्रम शाळेत चाचणी दरम्यान गरोदर असल्याने हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी नागभिड पोलीस ठाण्यात पोक्सो आणि भा.दं.वि. च्या गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट यांनी अत्यंत बारकाईने आणि गतीने पूर्ण करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. संदीप बा. नागपुरे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांच्या मार्फत या खटल्यात एकूण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, डीएनए चाचणी (DNA Test) अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांची साखळी अत्यंत महत्त्वाची ठरली. कोर्ट पैरवी म्हणून म.पो.शि. प्रीती पिंगे (ब.नं. ११०५) यांनी जबाबदारी सांभाळली.
प्रकरणातील सर्व पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरून मा. न्यायालयाने आरोपी विलास रंध्ये यास पोक्सो कायद्याच्या कलम ६ नुसार दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास आणि २,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास) तसेच भा.दं.वि. कलम ५०६ अंतर्गत १ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
गुन्हेगाराला पळवाट नाही असे हा निकाल दाखवून देतो की कायदा अत्यंत मजबूत आहे. वैज्ञानिक पुरावे (DNA) आणि पोलिसांचा तत्पर तपास यामुळे अशा विकृत गुन्हेगारांना शिक्षेपासून वाचणे अशक्य आहे.
कौटुंबिक किंवा जवळच्या व्यक्तींकडून होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध मुलींनी आणि महिलांनी घाबरून न राहता आवाज उठवणे गरजेचे आहे.
बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी समाज, शाळा आणि पालकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. लहान मुलांमधील बदलांकडे गांभीर्याने पाहून त्यांना सुरक्षित वातावरण देणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






