Chandrapur Fake Watches Raid Yogi Watch Center

चंद्रपुरात बनावट टायटन घड्याळांवर छापा: योगी वॉच सेंटरचा मालक पोलिसांच्या जाळ्यात

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 14, 2026

चंद्रपूर – Chandrapur Fake Watches Raid प्रकरणात चंद्रपूर शहर पोलिसांनी एकोरी वार्ड येथे मोठी कारवाई केली आहे. योगी वॉच सेंटर या दुकानातून टायटन आणि सोनाटा कंपनीची बनावट घड्याळे जप्त केली आहेत. पोलिसांनी एकूण ७८,२२५ रुपये किमतीचा बनावट मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. दुकानाचा मालक किशोर तेलरांडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (हे हि वाचा – ८ वर्षीय मुलाचा वडिलाने चिरला गळा)

प्राप्त माहितीनुसार, टायटन कंपनीच्या उत्पादनांची नक्कल करून ती विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकृत अधिकार ‘सिनजी सॉलिसिटर एलएलपी’ या लीगल फर्मला देण्यात आले आहेत. या कंपनीत वरिष्ठ प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले तक्रारदार गौरव शामनारायण तिवारी हे त्यांच्या तपास अधिकाऱ्यांसह १२ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपुरात तपासणीसाठी आले होते. या दरम्यान चंद्रपूर शहरातील एकोरी वार्ड येथील एका दुकानात टायटन आणि सोनाटा कंपनीच्या बनावट वस्तूंची विक्री होत असल्याची गुप्त माहिती फर्मच्या तपास अधिकाऱ्याला मिळाली.

योगी वॉच सेंटरमध्ये बनावट घड्याळांची विक्री उघडकीस

या माहितीच्या आधारे सिनजी सॉलिसिटर फर्मच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ चंद्रपूर शहर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कपिल घुगे, प्रकाश नखाते आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकासह तक्रारदार आणि पंचांनी कोठारी वार्ड येथील ‘योगी वॉच सेंटर’मध्ये छापा टाकला. दुकानात हजर असलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव किशोर नथुजी तेलरांडे (वय ५६ वर्षे, रा. एकोरी वार्ड, चंद्रपूर) असे सांगून स्वतःला दुकानाचा मालक असल्याचे सांगितले.

यानंतर पोलीस आणि तपास पथकाने पंचांसमक्ष दुकानाची सखोल पाहणी केली असता, तेथे टायटन आणि सोनाटा कंपनीचा मोठा बनावट माल आढळून आला. यामध्ये १२० सोनाटा डायल, ४०३ टायटन डायल, ६ टायटन घड्याळे, १२ सोनाटा घड्याळे, १९ टायटन डायल केस, ३२ सोनाटा डायल केस, २७ टायटन चेन, ३४ सोनाटा चेन आणि ६ सोनाटा घड्याळे (पट्ट्यासह) असा एकूण ६५९ नग बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आपल्या आर्थिक फायद्यासाठी नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट मालाची साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी दुकानाचे मालक किशोर तेलरांडे यांच्याविरुद्ध भारतीय कॉपीराईट ॲक्ट १९५७ चे कलम ५१, ६३, ६५ तसेच ट्रेडमार्क ॲक्ट १९९९ चे कलम १०३ आणि १०४ अन्वये चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment