Mundhada Hospital । सीसीटीव्हीत कैद झाला 'बोटतुट्या'; मुजोरचा शोध सुरु, मुंधडा हॉस्पिटल चोरी प्रकरणी एकास अटक

April 07, 2026 by Prakash Hande

Mundhada Hospital : चंद्रपूर - शहरातील मध्यभागी असलेल्या मुंदडा हॉस्पिटलमध्ये ५ एप्रिलला पहाटे ३.३० वाजता २ अज्ञात इसमांनी प्रवेश करीत डॉ. मनीष मुंधडा यांच्या केबिनमधील कागदपत्रे व रोख रक्कम लांबवली, हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावत एका आरोपीला अटक केली आहे. (मुंधडा हॉस्पिटलमध्ये चोरी, सीसीटीव्हीत घटनाक्रम कैद)

 

 ४ एप्रिल रोजी कान, नाक व घसा तज्ञ मनीष मुंधडा हे नेहमीप्रमाणे रुग्णालयातील ओपीडी मधील रुग्णांची तपासणी करीत होते, त्यानंतर ते घरी गेले, मात्र भल्या पहाटे त्यांच्या केबिनमध्ये २ अज्ञात युवकांनी प्रवेश करीत लाकडी आलमारी मधील ६० हजार रुपये लांबवीले.

 

गुन्ह्याचे गांभीर्य बघता पोलीस अधीक्षकांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेला आदेश दिला, गुन्हे शाखेच्या पथकाने आधी परिसरातील व रुग्णालयातील सीसीटीव्ह फुटेज तपासले, आरोपींचा मागोवा घेतल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार २३ वर्षीय श्रीकांत उर्फ बोटतुटया राजू चुनारकर राहणार आनंदनगर, महाकाली कॉलरी चंद्रपूर याला ताब्यात घेतले.

 

आरोपी जवळून चोरी गेलेली रक्कम जप्त करण्यात आली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी २५ वर्षीय अतुल उर्फ मुजोर विकास राणा राहणार शामनगर याचा शोध पोलीस घेत आहे. मुंधडा हॉस्पिटलमध्ये चोरी करण्यासाठी आरोपींनी यापूर्वी रेकी केली असावी, हॉस्पिटलमधील दैनंदिनी काय? रुग्ण कुठे बसतात, डॉक्टर यांचे केबिन मधील रक्कम कुठे ठेवतात यावर आरोपींनी नजर ठेवली असे अशी शक्यता आहे. गुन्हेगार आपल्या कामात कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्यांच्या गच्चीपर्यंत पोहोचताच.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.        

Leave a Comment

+