Bee Attack News : चंद्रपूर - सातबहिणी डोंगरावर नवस फेडण्यासाठी गेलेल्या ४ भाविकांवर मधमाशांनी हल्ला चढवीत जखमी केले, जखमींमध्ये ३ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तळोधी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगर पेरजागड येथे आज १५ मार्चला दुपार दरम्यान मधमाशांनी हल्ला केल्याने शंकरपूर येथिल भाविक जखमी झाल्याची घटना घडली. (कामावर जाताना सायकलस्वाराचा घात झाला, सायकलने चिरडले)
तळोधी वनपरिक्षेत्रातील सात बहिणी डोंगरावर चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील ५५ वर्षीय शंकर चाचरकर, ६२ वर्षीय नथ्थू चाचरकर, ५२ वर्षीय सुनिता चाचरकर, ३ वर्षीय सायली चाचरकर आज सात बहिणी डोंगरावर लहान मुलाचा नवस फेडण्याकरिता आलेले होते.
दुपारी दोन वाजता अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने भाविक सैरावैरा पळू लागले. दगडाचा रस्ता असल्यामुळे सुरक्षित खाली कठिण होत होते. त्यामुळे मधमाश्यांच्या चारही भाविकांना डंख मारत जखमी केले. घटनेची माहिती वनविभागाचे कर्मचारी व स्वाब संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमीना तात्काळ उपचारासाठी गोविदपूर व तळोधी येथिल रुग्णालयात दाखल केले.
यावेळी वन विभागाचे वन रक्षक सारंगगड बिटावरचे नन्नावरे व गोविंदपुर बीटाचे वनरक्षक कागणे यांच्यासोबतच स्वाब संस्थेचा बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, स्वाब चे अध्यक्ष यश कायरकर, सदस्य जीवन गुरनुले, अमिर करकाडे गणेश गावतुरे, सुरज नेवारे, नितीन भेंडाळे, गणेश गुरनुले, यांनी जखमींना डोंगरावरून खाली आणले.
सात बहिणी डोंगरांवर मधमाशांनी हल्ला करण्याच्या घटना नित्याचीच बाब झाली आहे. मात्र तरीही येथे पर्यटकांची वर्दळ असते. वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Leave a Comment