हे कसं घडलं? भररस्त्यात ट्रक अनियंत्रित होऊन शेतात शिरला; मध्यप्रदेशातील चालकाचा दुर्दैवी मृत्यू

February 02, 2026 by Prakash Hande

Truck Accident Today : कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात दुपारच्या सुमारास एका विचित्र अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झाला, तालुक्यातील वनसडी-अंतरंगाव मार्गावरील अंतरंगावच्या हद्दीत ट्र्क अनियंत्रित झाला, सदर अनियंत्रित ट्र्क हा थेट शेतात शिरला, अचानक घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांनी शेतात धाव घेतली असता वाहनचालकांचा मृत्यू झाला होता. याबाबत कोरपना पोलिसांना नागरिकांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. (चंद्रपूर कांग्रेस पक्षात घमासान, नगरसेवकांच्या घरावर लावले नोटीस)

२ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजेदरम्यान नूरानी ट्रान्सपोर्ट बल्लारपूर चा ट्र्क कोळसा घेऊन दालमिया कंपनी नारंडा मध्ये आला होता, परतीच्या वाटेवर असताना अचानक ट्र्क अनियंत्रित झाला, चालकाने वाहन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र ट्र्क थेट शेतात शिरला, शेतात मध्यभागी ट्र्क थांबला मात्र अतिवेगात असल्याने वाहनचालक रवि सिंग भगवानदास खैरवार राहणार सिंगरौली मध्यप्रदेश यांच्या छातीला स्टेअरिंग लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ट्रक मध्ये चालक एकटा होता, कोरपना पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवाल आल्यावर वाहनचालकांचा मृत्यू नेमका कश्याने झाला याबाबत माहिती मिळेल. पुढील तपास कोरपना पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.  

Leave a Comment

+