राजुरा पोलिसांनी हद्दपारी आदेश उल्लंघनप्रकरणी केलेली कारवाई दर्शवणारे प्रतिकात्मक छायाचित्र

राजुरात हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन, गणेश विसर्जन कालावधीत एकावर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 26, 2026

राजुरा : Rajura Externment Order Violation प्रकरणी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बजावलेल्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने एका तरुणावर राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलदेवसिंग उर्फ लल्ली शेरगील असे आरोपीचे नाव असून, अपर पोलीस अधीक्षकांनी २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश दिले होते. गस्तीदरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला तो हद्दीत आढळून आल्याने कारवाई करण्यात आली. (कुटुंब बाहेर घरातील सोने लंपास, वाचा हि बातमी)

गणेश विसर्जन कालावधीसाठी बजावलेला हद्दपारीचा आदेश आणि Rajura Externment Order Violation

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या संवेदनशील वातावरणात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी, चंद्रपूर यांनी २१ सप्टेंबर २०२६ च्या आदेशान्वये २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित इसमाला राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई आदेश (हद्दपारी) बजावले होते. हा मनाई आदेश २३ सप्टेंबर रोजी संबंधित आरोपीला समक्ष बजावून हद्दीबाहेर राहण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या.

असे असतानाही २५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजताच्या सुमारास राजुरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक रामपूर परिसरात गस्त घालत असताना, आरोपी बलदेवसिंग हा रामपूर येथील आपल्या भाड्याच्या घरासमोरील पोर्चमध्ये बसलेला दिसून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याची चौकशी केली असता त्याने हद्दीत राहण्याबाबत कोणतेही समर्पक व कायदेशीर कारण दिले नाही.

शासकीय आदेशाचे उल्लंघन करून गणेश विसर्जन कालावधीत हद्दीत राहिल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात आरोपी बलदेवसिंग शेरगील विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३ (सरकारी आदेशाची अवज्ञा करणे) अन्वये गुन्हा (प्रथम खबर क्र. ०७४६/२०२६) दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाणे प्रभारी निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनुप डांगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment