चंद्रपूर – Chandrapur Ganesh Visarjan Politics या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी शहरातील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न झाला, मात्र यावेळीही राजकीय पक्षांतर्गत गटबाजी स्पष्टपणे दिसून आली. भाजपचे दोन, काँग्रेसचे दोन आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दोन असे एकूण सहा स्वागत मंडप नागरिकांनी पाहिले. आमदार मुनगंटीवार-जोरगेवार तसेच वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील मतभेद यंदाही मंडप व्यवस्थेतून समोर आले, तर शिवसेना-युवासेना यांचेही वेगळे मंडप लक्षवेधी ठरले. (राजुऱ्यात कांग्रेसचा जन आक्रोश मोर्चा, वाचा हि बातमी)
Chandrapur Ganesh Visarjan Politics: सहा वेगवेगळे स्वागत मंडप
२५ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी शहरातील लाखो लोकांनी भक्तिभावात बाप्पाला निरोप दिला. लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव नागरिकांनी एकत्र येऊन साजरा करावा असा उद्देश्य समोर ठेवत या उत्सवाची सुरुवात केली होती. आजही हा उत्सव थोड्या आधुनिक पद्धतीमध्ये साजरा होतो. विसर्जन मिरवणूक सोहळ्यात नागरिक व गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्ष पुढे येत असतात मात्र मागील काही वर्षांपासून एकाच पक्षाचे नेते हे आपलं राजकीय प्रस्त सिद्ध करण्यासाठी वेगळी चूल मांडत असताना दिसत आहे.
मुनगंटीवार-जोरगेवार आणि वडेट्टीवार-धानोरकर यांच्यातील जुना वाद
चंद्रपुरात या विसर्जन सोहळ्यात भाजप चे २, कांग्रेस पक्षाचे २ तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे २ स्वागत मंडप यावर्षी नागरिकांनी बघितले. निवडणूक दरम्यान सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे नेते आपल्या पक्षाच्या नेत्यांशी जुळवून घेत नाही असे चित्र सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात दिसत आहे. आमदार मुनगंटीवार- आमदार जोरगेवार हा वाद काहीसा जुना आहे, कांग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून गटबाजी सुरु आहे तर शिवसेना पक्ष वेगळा झाला, सत्तेसाठी काहींनी पक्षाची साथ सोडली, एकाच पक्षाचे दोन तुकडे झाले, त्यानंतर सुद्धा या फुटलेल्या पक्षात एकी नाही.
शिवसेना-युवासेना मंडपांनी वेधले लक्ष
आमदार जोरगेवार व आमदार मुनगंटीवार यांच्यातील वाद जिल्ह्यातील नागरिकांनी बघितला आहे, दोन्ही नेते एकाच मंचावर कदाचित दिसतात, मात्र गणेश विसर्जन सोहळ्यात आजूबाजूला स्वागत मंडप लावण्यात आले, नेहमीप्रमाणे मंडपाच्या परवानगीचा वाद यंदाही बघायला मिळाला. दोन्ही नेत्यांच्या स्वागत मंडपात त्यांचे समर्थक हजर होते. तर दुसरीकडे वडेट्टीवार व धानोरकर यांचेही मंडप वेगवेगळे लावण्यात आले. कांग्रेसच्या वडेट्टीवार गटात त्यांचे समर्थक नेते व नगरसेवक व दुसऱ्या स्वागत मंडपात स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर व त्यांचे समर्थक व नगरसेवक हजर होते.
तर दुसरीकडे शिवसेना व युवासेना यांचे वेगवेगळे मंडप बघून यंदा त्यांच्या समर्थकांना आश्चर्याचा धक्का बसला. एकीकडे मनपातील सत्ताधारी शिवसेना व दुसरीकडे युवासेना, हे दोन्ही स्वागत मंडप यंदा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते. मात्र सर्वात जास्त नागरिक व समर्थकांचा कल युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व महानगर प्रमुख सुरेश पचारे यांच्याकडे दिसला. या विसर्जन सोहळ्यात सर्व धर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहत, गणपती बाप्पाला निरोप दिला.
या विसर्जन सोहळ्यात सर्वात आनंदी गणेश मंडळाचे अध्यक्ष होते, कारण त्यांना एकाच पक्षाकडून दोनदा स्वागत सत्कार स्वीकारावा लागला होता. फक्त गट वेगवेगळे होते. राजकीय गटबाजीच्या या शो बाजीला बघण्याकरिता नागरिकांसह पक्षाच्या निष्ठावंतांनी उपस्थिती दर्शविली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






