गोंडपिपरी हद्दपारी कारवाईसंदर्भातील पोलीस ठाण्याचे छायाचित्र

सराईत गुन्हेगार हद्दपार, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 30, 2026

चंद्रपूर: गोंडपिपरी हद्दपारी कारवाईत दोन व्यक्तींना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन व्यक्तींविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्तावावर सुनावणी घेतल्यानंतर हे आदेश दिले. गोंडपिपरी पोलिसांनी आदेश बजावून कायदेशीर कारवाई पूर्ण केली.

पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्याच्या उद्देशाने एका कारवाईत दोन कुख्यात व सराईत इसमांवर हद्दपारीची धडक कारवाई केली आहे. गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ)(ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी गोंडपिपरी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्तावानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी दोन्ही संबंधित इसमाविरुद्ध प्रत्येकी ०६ महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश पारित केले असून, गोंडपिपरी पोलिसांनी सदर आदेश बजावून कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे. (महिलेवर दुष्कर्म, आरोपीला जन्मठेप, वाचा बातमी)

गोंडपिपरी हद्दपारी कारवाईचे कारण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशफाक मस्तान कुरेशी (वय ४३ वर्ष, रा. गोंडपिपरी, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) आणि सुंदरसिंग उर्फ सुल्वंदरसिंग तेजासिंग डांगी (वय २३ वर्ष, रा. जोगापूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोन्ही सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांच्याही विरोधात गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने गोंडपिपरी पोलीस स्टेशनकडून हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दोन्ही गुन्हेगारांना ६ महिन्यांसाठी जिल्ह-यातून किंवा संबंधित क्षेत्रातून तडीपार करण्याचे आदेश दिले असून, पोलिसांनी तातडीने अंमलबजावणी करत कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे.

या धडक कारवाईमुळे परिसरातील समाजकंटकांचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अत्यंत प्रभावी व कठोर कायदेशीर कारवाईचा सज्जड इशारा देण्यात आला आहे. यापुढील काळातही अशा प्रकारच्या समाजविघातक कारवाया करणाऱ्यांनी अत्यंत सतर्क राहावे, अन्यथा पोलिसांकडून यापेक्षाही अधिक कठोर आणि जडजोडीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा गोंडपिपरी पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी व शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सदर यशस्वी व धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे आणि मुलचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment