Rajura Murder Life Sentence प्रकरणी निकाल देणाऱ्या चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रातिनिधिक चित्र

त्याने पत्ते खेळू दिले नाही, रागाच्या भरात थेट सूरी खुपसली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 25, 2026

चंद्रपूर: Rajura Murder Life Sentence प्रकरणात चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. पत्ते खेळू न दिल्याच्या वादातून ११ डिसेंबर २०२२ रोजी राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे तरुणाची हत्या झाली होती. न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवले. जन्मठेपेसह ५,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा साधा कारावास ठोठावण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.. (पैश्याचा वाद ठेकेदारांचा गळा चिरला, वाचा हत्येची बातमी)

Rajura Murder Life Sentence: न्यायालयाचा निकाल काय आहे?

ही धक्कादायक घटना ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास राजुरा तालुक्यातील बामणवाडा येथे घडली होती. आरोपी हा त्या ठिकाणी पत्ते खेळत असलेल्या ठिकाणी आला असता, मृत तरुणाने त्याला पत्ते खेळू दिले नाहीत. या रागातून आरोपीने त्या ठिकाणी पाणी टाकले, ज्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणाचा राग अनावर झाल्याने आरोपीने आपल्याजवळील लोखंडी सुरी थेट मृत तरुणाच्या पोटात खुपसून त्याला जागीच ठार केले. या घटनेनंतर राजुरा पोलीस ठाण्यात प्राप्त तोंडी रिपोर्टवरून कलम ३०२ भादंवि सह ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा रजिस्टर क्र. ५००/२०२२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तातडीने अटक करण्यात आली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी तत्परतेने सखोल तपास केला. त्यांनी घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि मजबूत परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून वेळेत मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. श्रीमती सिमा रामटेक आणि श्री. पि. जि. घट्टूवार यांनी आरोपीविरोधात भक्कम युक्तीवाद करत साक्ष आणि पुरावे न्यायालयासमोर मांडले.

तपास, युक्तिवाद आणि खटल्यातील पोलीस पथक

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि मांडलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीला कलम ३०२ भादंवि अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार ललीता शेंडे (ब.नं. १५५, पोलोसे राजुरा) आणि चंद्रपूर दोषसिद्धी कक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली. ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment