Warora Gambling Raid News वरोरा पोलीस जुगार कारवाई

वरोऱ्यात उघड्यावर सुरू असलेला जुगार अड्डा पोलिसांकडून उध्वस्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 27, 2026

वरोरा (चंद्रपूर): Warora Gambling Raid News: वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वंधली ते माढेळी रस्त्यावरील एका शेतात छापा टाकण्यात आला. उघड्यावर सुरू असलेल्या ५२ पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई झाली. पोलिसांनी ५ आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या धाडीत १४,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. (हे हि वाचा – व्हाट्सअप वर लिंक आली अन खात्यातून उडाले ३ लाख)

मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार हे आपल्या पोलीस ताफ्यासह भागामध्ये गस्त घालत असताना, वंधली ते माढेळी जाणाऱ्या रोडवरील चंदनखेडे यांच्या शेतातील मोकळ्या जागेत काही इसम पैशांची बाजी लावून ५२ पत्त्यांचा हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय बातमी बातमीदाराकडून मिळाली. पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोंटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष संबंधित शेतात छापा टाकला.

त्या वेळी घटनास्थळी ५ जण पत्त्यांवर जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता रमनैया नलैया गुडुरी (वय ५०, रा. शेगाव), विठ्ठल लटारी हुलके (वय ४४, रा. माढेळी), रविंद्र सुभाष साळवे (वय ४८, रा. माढेळी), विजय महादेवराव सातपुते (वय ५३, रा. माढेळी) आणि बाबाराव वारलुजी फुसदेकर (वय ६१, रा. सोईट) अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली. आरोपींच्या अंगझडतीत ११,८७० रुपये, जुगाराच्या डावावर मिळून आलेली २,२५० रुपयांची रोकड आणि ५० रुपये किमतीचे ५२ तासांचे पत्ते असा एकूण १४,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार यांच्या तक्रारीवरून सर्व ५ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत नागोसे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment