शेगाव (बु.): येरखेडा सट्टापट्टी छापा कारवाईत शेगाव (बु.) पोलिसांनी देवराव परसराम गजभे (वय ५७) याला रंगेहात अटक केली. ही कारवाई ४ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. सण-उत्सवाच्या काळातील अवैध धंद्यांविरोधी मोहिमेदरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुमीत कांबळे यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. अंगझडतीत सट्टापट्टीच्या तीन चिठ्ठ्या, एक पेन आणि १,१७० रुपये रोख जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, १८८७ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (प्रेम संबंधांच्या संशयातून चाकूने वार, वाचा हि बातमी)
येरखेडा सट्टापट्टी छापा: गुप्त माहितीवरून कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक सुमीत कांबळे हे आपल्या पोलीस पथकासह परिसरात गस्तीवर असताना, येरखेडा येथील देवराव गजभे हा आपल्या घरासमोर वरली मटक्याचे बोगस आकडे लिहून लोकांकडून पैसे स्वीकारत हार-जीतचा जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती मुखबिराकडून मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी निष्पक्ष पंचांना पाचारण करून येरखेडा बस स्थानक चौक परिसरात बोलावले आणि घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक आणि पंचांनी मिळून संशयित आरोपीच्या घराजवळ छापा टाकला.
घटनास्थळी एक व्यक्ती संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव देवराव परसराम गजभे असे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपीच्या पॅन्टच्या खिशातून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेल्या ३ कागदी चिठ्ठ्या, एक निळ्या-काळ्या रंगाचे पेन आणि १,१७० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी हे सर्व साहित्य पंचांसमक्ष जप्त केले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुमीत कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी देवराव गजभे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये शेगाव (बु.) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर गाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






