Financial Challenge : चंद्रपूर महावितरणचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

News34 chandrapur

चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक आस्थापना, उद्योग, शासकीय कार्यालये, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, कृषी पंप योजना यासह विविध क्षेत्रातील थकबाकी तब्बल 516 कोटी 19 लाखांवर पोहोचली आहे. या आर्थिक आव्हानाला तोंड देण्यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी ग्राहकांना महावितरणची सध्याची आर्थिक स्थिती समजून घेऊन कंपनीला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. Financial challenge

 

चंद्रपूर परिमंडळात चालू व मागील वर्षातील एकूण मागणीमध्ये घरगुती ग्राहकांकडून 13 कोटी 95 लाख, व्यावसायिक ग्राहकांकडून 4 कोटी 76 लाख, औद्योगिक ग्राहकांकडून 3 कोटी 15 लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडील 4 कोटी 36 लाखांचा समावेश आहे. Power supply

 

सरकारी आणि इतर लहान आस्थापने 5 कोटी 61 लाख, आणि कृषी पंप ग्राहकांचा वाटा 350 कोटी 51 लाख आहे. याशिवाय पथदिव्यांची थकबाकी १३४ कोटी ३५ लाखांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2024 या कालावधीत चंद्रपूर परिमंडळातील 12 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील 7 हजार 244 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 782 ग्राहकांचा वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित करण्यात आला आहे. महावितरणने ग्राहकांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. महावितरणसमोरील आर्थिक आव्हाने समजून घेऊन, ग्राहक कंपनीच्या स्थिरता आणि टिकावासाठी सक्रियपणे योगदान देऊ शकतात. Mahavitaran

 

अखंडित वीजपुरवठा आणि अत्यावश्यक सेवांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी सर्व भागधारकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. महावितरण आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आणि या नाजूक काळात त्यांची समजूत आणि सहकार्य शोधत आहे. एकत्रितपणे, आपण या आव्हानांवर मात करू शकतो आणि सर्वांच्या फायद्यासाठी एक मजबूत, अधिक लवचिक ऊर्जा पायाभूत सुविधा तयार करू शकतो. Energy infrastructure

 

जिल्हानिहाय थकबाकी 
        चंद्रपूर जिल्हा – घरगुती  ग्राहकांकडुन 9 कोटी 60 लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन 3 कोटी 95 लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन  2 कोटी 14 लाख थकबाकी वसुली येणे आहे,  ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून 3 कोटी 84 लाख येणे आहे तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून 2 कोटी 24 लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून 236 कोटी 21 लाख व पथदिव्यांची थकबाकी 70 कोटी 76 लाखाच्या  घरात पोहोचली आहे.
*******************
      गडचिरोली जिल्हा -घरगुती  ग्राहकांकडुन 4 कोटी 35 लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन 81 लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन  1 कोटी 1 लाख थकबाकी वसुली येणे आहे,  ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून 52 लाख येणे आहेत. सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून 3 कोटी 37 लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून 114 कोटी 30 लाख व पथदिव्यांची थकबाकी 63 कोटी 59 लाखाच्या  घरात पोहोचली आहे. Chandrapur circle
     नोटीशीची मुदत संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु आहे.
*******************
 BOX महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी 31 मार्च 2023  नुसार दिलेल्या आदेशान्वये 1 ऑगस्ट 2023 पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ 5 हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा10 हजार एवढी राहणार आहे.
    महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने  विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा फक्त आणि फक्त वीज बिलाची पूर्ण रक्कम भरून  करता येवू शकतो. तसेच महापॉवर पे या सुविधेच्या माध्यमातुन नजीकच्या किराणा दुकानात सदर सुविधा उपलब्ध असल्यास महापॉवर पे च्या माध्यमातुन देखील वीजबिल चा भरणा करता येणार आहे. Maha power pay
      पार्ट पेमेंट किंवा तुकडा वीज बिल भरणा आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन जर विज बिल भरायचे असेल तर ते पूर्ण विज बिल भरावे लागते याची नोंद घ्यावी. Online payment
    या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.5000/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची  सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या 0.25टक्के (जास्तीत जास्त रु.500/-इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे.
       दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे व महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वसुलीतून प्राप्त पैशामधून 85 टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते हे आता ग्राहकांही जाणून आहेत.
     महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते.तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी  वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना त्यांना घरी बसून विज बिल भरण्याची सोय उपलब्ध असताना, वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे.
    महिनाभराच्या वीज वापरण्यासाठी महिनाभर वेळ हाती असताना थकबाकीदार ग्राहक वेळेवर विज बिल भरत नाही आणि मग नाईलाजाने महावितरणला त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा लागतो.
    तर, वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना पुन्हा पुनर्जोडणी साठी ऑफिस मध्ये जाऊन पुनर्जोडणी जोडणी शुल्क भरणे, यासाठी ऑनलाईन सुविधा ही आहे तरी थकबाकी साठी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक स्वतःहुन त्रास स्वतःवर ओढवून घेतात.
   तर, दुसरीकडे महावितरणच्या कर्मचार्यांना, थकबाकीदारांना वारंवार फोन करून सांगावे लागते विज बिल भरा म्हणून, विनंती करावी लागते, घरी जाऊन सांगावे लागते.
     वीजग्राहकांना 24 तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!