चंद्रपूर: Chandrapur Tata Showroom Theft प्रकरणात चंद्रपूर पोलिसांनी वेगवान कारवाई करत मोठे यश मिळवले. रामनगर परिसरातील Tata Showroom चे लॉकर फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला LCB ने काही तासांत उमरेड येथून अटक केली. आरोपीकडून चोरीतील रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली Tata Harrier कार जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे चंद्रपूर पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. (हे हि वाचा – मुक्ताई धबधबा बगण्यासाठी निघाली, आणि झाला अपघात)
Chandrapur Tata Showroom Theft : चोरीचा उलगडा कसा झाला?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टाटा शोरूममध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास अनाधिकृतपणे प्रवेश केला. चोरट्याने शोरूममधील मुख्य गोदरेज लॉकर अतिशय हुशारीने खोलून त्यातील रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरात शोरूम फोडून झालेल्या या मोठ्या चोरीमुळे व्यापारी वर्गात आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला.
उमरेडमधून सराईत आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या शहर पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या अत्यंत गोपनीय बातमीदाराच्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान या गुन्ह्यात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी असलेला प्रथम प्रभाकर दडमल (वय २४ वर्षे) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी प्रथम दडमल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने टाटा शोरूममधील लॉकर फोडून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून चोरीतील नगदी ५७ हजार १४० रुपये रोख आणि या गुन्ह्यात वापरण्यात आलेली २० लाख रुपये किमतीची आलिशान टाटा हॅरियर वाहन असा एकूण २० लाख ५७ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५ आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपी प्रथम दडमल यास पुढील वैधानिक कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही धडक आणि यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या विशेष पथकाने केली आहे. हायटेक पद्धतीने झालेल्या या चोरीचा अवघ्या काही तासांत छडा लावून आरोपीला मुद्देमालासह बेड्या ठोकल्यामुळे चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






