Married Woman Suicide : बल्लारपूर - शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्ड परिसरात आज सकाळी एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव श्रावणी सूरज केशकर (वय २९ वर्षे) असे आहे. (चंद्रपूरच्या रेतीघाटावर भाजप महामंत्र्याची हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मृत महिलेचा पुतण्या काही कामानिमित्त घरी गेला असता, श्रावणी या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्याने तात्काळ ही माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.
श्रावणी यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा आहे. आज सकाळी पती-पत्नीने एकत्र चहा घेतला होता. पती रंगपंचमीसाठी तयारी करत असताना ही घटना समोर आली.
या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार संदीप दुर्योधन तसेच महिला पोलीस कर्मचारी रुपाली माथनकर हे करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Leave a Comment